Corona Virus in India: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढ लागली आहे. यामुळे भारतीय नागरिकामध्ये देखील पुन्हा एकदा भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बीए.५.२ आणि बीएफ.७ हे करोनाचे नवीन व्हेरिएंट आढळले आहेत. सरकारकडून देखील पावले उचलली जात असून, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या पहिल्या लाटेमध्ये गॅजेट्स देखील महत्त्वाचे ठरले होते. त्यामुळे पुन्हा येणाऱ्या या लाटेचा सामना करण्यासाठी तुमच्या घरात काही महत्त्वाचे गॅजेट्स असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
पल्स ऑक्सीमीटर (pulse oximeter): कोरोनाच्या लढाईत प्लस ऑक्सिमीटर खूपच महत्त्वाचे डिव्हाइस आहे. करोनारुग्णांचे ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी या डिव्हाइसचा उपयोग होतो. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे.
UV स्टरलाइजर (UV Sterilizer): UV Sterilizer द्वारे इलेक्ट्रॉनिक आणि इतर गॅजेट्सला व्हायरस आणि किटाणूंपासून दूर ठेवू शकता. हे गॅजेट्स तुम्हाला १ ते २ हजार रुपयात मिळेल.
पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर (portable oxygen concentrator): घरात पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देखील असायलाच हवा. portable oxygen concentrator ची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे.
नेब्युलाइजर मशीन (Nebulizer Machine): करोनाविरुद्धच्या लढाईत या डिव्हाइसचा खूपच उपयोग होईल. याद्वारे फुफ्फुसांपर्यंत थेट ऑक्सिजन पोहचवण्यास मदत होती. बाजारात याची किंमत १५०० रुपयांपर्यंत आहे.
कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर (Contactless Thermometer): बऱ्याच ठिकाणी थर्मामीटरचा वापर होताना तुम्ही पाहिले असेल. सहज कोणत्याही व्यक्तीचे टेम्प्रेचर तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. याची किंमत १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे. याशिवाय, Blood Pressure Machine आणि Covid-19 Rapid Antigen Self Test Kit घरात असल्यास नक्कीच याचा उपयोग होईल.
हेही वाचा: Realme Festival Sale : स्मार्टफोनवर मिळतायेत दमदार ऑफर, कमी किमतीत करा खरेदी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.