5G Launch: दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून देशात JIO 5G सेवांची लाँचिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ४ दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात या सेवांना सुरूवात करणार आहे. jioचं 5G हे संपूर्णपणे आत्मनिर्भर असणार आहे. मात्र 5G लाँचिंगनंतर आता हे नेटवर्क कोणत्या मोबाईलमध्ये सपोर्ट करणार असाही प्रश्न निर्माण झालाय.
तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 5G सीम घेण्याचा विचार करत असाल तर आधी तुम्हाला सदर यादी माहिती असणं आवश्यक आहे. या यादीमध्ये अशा सगळ्या मोबाईल्स कंपन्यांची यादी आहे ज्यामध्ये कोणते स्मार्टफोन जीओ 5Gला सपोर्ट करेल याबाबत सांगितल्या गेलेय.
शाओमी, रेडमी आणि पोको स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट करतं. शाओमी कंपनीने असेही म्हटले आहे की OTAच्या माध्यमातून सगळ्याच फोनमध्ये SA 5G नेटवर्क सपोर्ट दिल्या जाईल. शाओमीच्या Xiaomi 11 Lite NE 5G ते Xiaomi 12 Pro पर्यंत सगळ्याच फोनमध्ये जीओचं 5जी सीम सपोर्ट करेल. तसेच Redmi K50i 5G आणि Redmi Note 11T 5G सोबत SA चा सपोर्ट असल्यास जीओचं 5G ही सपोर्ट करेल. पोकोच्या M4 5G पासून ते X4 Pro 5G मध्येही NSA आणि SA नेटवर्कचा सपोर्ट आहे.
जाणून घ्या फोनच्या सीरीजनुसार कोणत्या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट करेल
Realme 5G फोन
Realme 9 Pro Plus 5G
9 Pro 5G
Realme 9i 5G
OnePlus 5G फोन
OnePlus 8 series
OnePlus 10 Pro
OnePlus 10R
OnePlus 10T
OnePlus Nord 2 5G
Nord CE 2 5G
OnePlus Nord CE 2 Lite
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.