5G म्हणजे काय? आणि हे तंत्रज्ञान भारतात कसे काम करेल? जाणून घ्या

5g launch in India
5g launch in India
Updated on

5g launch in India : येत्या नव्या वर्षात भारतीयांना 5G ची भेट मिळणार आहे. दूरसंचार विभागाने सांगितले की, 5G इंटरनेट सेवेची टेस्टिंग अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 2022 मध्ये ही सेवा देशात सुरू होईल, असे विभागाने म्हटले आहे. सर्व प्रथम देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू होणार आहे. विभागाने या 13 शहरांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

दूरसंचार विभागाने (DoT) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, Airtel, Jio आणि Vodafone Idea सारख्या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी गुरुग्राम, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे आणि गांधीनगर येथे 5G ट्रायल साइट सेटअप केली असून. पुढील वर्षी या मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. ही देशातील पहिली काही शहरे असणार आहेत, ज्या ठिकाणी 5G सुरु होणार आहे असे दूरसंचार विभागाने (DoT) सोमवारी (27 डिसेंबर) अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, DoT ने 5G बँडसह पुढील 10 वर्षांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या विक्री आणि वापराबाबत दूरसंचार आणि उद्योग तज्ञांकडून इनपुट मागवले होते.

5g launch in India
देशात सुरु होणार 5G पर्व; 'या' सहा शहरांना मिळणार सेवेचा पहिला मान

5G नेटवर्क काय आहे?

5G किंवा 5th जनरेशन हे लेटेस्ट अपग्रेड असलेले मोबाइल ब्रॉडबँड नेटवर्क असून 5G नेटवर्क हे प्रामुख्याने 3 बँडमध्ये काम करते, म्हणजे लो, मिड आणि हाय फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम, दरम्यान या सर्व फ्रिक्वेन्सीचे स्वतःचे असे काही उपयोग तसेच काही मर्यादा देखील आहेत.

इंटरनेट आणि डेटा एक्सचेंज कव्हरेज आणि स्पीडच्या बाबतीत लो बँड स्पेक्ट्रम (Low band Spectrum) बेस्ट आहे, यामध्ये इंटरनेट स्पीड 100 एमबीपीएस (मेगाबिट्स प्रति सेकंद) पर्यंत मर्यादित आहे. याचा अर्थ असा की, टेलिकॉम कंपन्या सेलफोन वापरकर्त्यांसाठी ते वापरू शकतात आणि इंस्टॉल करू शकतात ज्यांना खूप हाय स्पीड इंटरनेटचा गरज नाहीये अशा ग्राहकांसाठी लो स्पेक्ट्रम बेस्ट असू शकते.

दुसरीकडे, मिड-बँड स्पेक्ट्रम (Mid band Spectrum), लो बँडच्या तुलनेत हायस्पीड देते , परंतु कव्हरेज क्षेत्र आणि सिग्नलच्या एक्सेस बाबतीत मर्यादा आहेत. टेलिकॉम कंपन्यांनुसार या बँडचा वापर उद्योग आणि विशेष फॅक्टरी युनिट्सद्वारे कॅप्टिव्ह नेटवर्क तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो जे त्या विशिष्ट उद्योगाच्या गरजा पूर्ण करू शकतात.

हाय-बँड स्पेक्ट्रम (High band Spectrum) तिन्ही बँडमध्ये सर्वाधिक स्पीड देते, परंतु त्यात अत्यंत मर्यादित कव्हरेज आणि सिग्नल पेनिट्रेशन क्षमता आहे. 5G च्या हाय-बँड स्पेक्ट्रममधील इंटरनेट स्पीड 20 Gbps (गीगा बिट्स प्रति सेकंद) इतका जास्त असल्याचे समोर आले आहे. आजवर 4G मध्ये इंटरनेट सर्वाधिक डेटा स्पीड ही 1 Gbps इतकीच नोंदवली गेली आहे.

5g launch in India
Airtel आणि Vi चे प्रीपेड प्लॅन्स, मिळेल तीन महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी

5G तंत्रज्ञानाच्या भारतात शक्य आहे का?

इतर देशांप्रमाणेच भारतात देखील हाय स्पीड नेटवर्क सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तीनही खाजगी दूरसंचार कंपन्या, रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocom), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्ही (Vi), स्पेक्ट्रम वाटप आणि 5G फ्रिक्वेन्सी बँडचा एक स्पष्ट रोड मॅप तयार करण्यासाठी DoT ला आग्रह करत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या सेवांच्या रोलआउटचे प्लॅनिंग त्या करू शकतील. मात्र, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीनपैकी दोन कंपन्यांकडे रोख रक्कम आणि पुरेसे भांडवल नसणे हा एक मोठा अडथळा आहे.

दुसरीकडे, रिलायन्स जिओकडे संपूर्ण एन्ड-टू-एंड 5G सोल्यूशन असल्याचे म्हटले जाते जे नेटवर्क सुरू झाल्यानंतर सेवा सुरु करण्यासाठी तयार आहे.

5g launch in India
Google Maps फक्त रस्ते सांगत नाही, जाणून घ्या इतरही भन्नाट फीचर्स

5G बद्दल जगात काय सुरु आहे?

सरकारांपेक्षा जागतिक दूरसंचार कंपन्यांनी 5G नेटवर्क उभे करणे आणि ते त्यांच्या ग्राहकांना टेस्टिंग स्तरावर सेवा देणे सुरु केले आहे. यूएस सारख्या देशांमध्ये, AT&T, T-mobile आणि Verizon सारख्या कंपन्यांनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी कमर्शियल 5G देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

AT&T सारख्या काही कंपन्यांनी 2018 च्या सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाची टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट सुरू केली होती, तर Verizon सारख्या इतर कंपन्यांनी 2020 च्या अखेरीस त्यांच्या 5G अल्ट्रा-वाइड ब्रॉडबँड सेवांचा 60 शहरांमध्ये विस्तार केला आहे. चीनसारख्या इतर देशांमध्ये, China Unicom सारख्या काही दूरसंचार कंपन्यांनी 2018 च्या सुरुवातीला 5G टेस्टिंग सुरू केल्या होत्या आणि तेव्हापासून वापरकर्त्यांसाठी व्यावसायिक सेवा सुरू केल्या आहेत. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग , ज्याने 2011 मध्ये 5G तंत्रज्ञानावर संशोधन सुरू केले होते, अनेक कंपन्यांसाठी 5G नेटवर्कसाठी हार्डवेअर तयार करण्याच्या बाबतीत आघाडी घेतली आहे.

5g launch in India
Jio चा 'हॅपी न्यू इयर 2022' प्लॅन, 365 दिवस मिळाणार खास बेनिफिट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.