एअरटेल आणि रिलायन्स जिओने देशात मोजक्या शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू केले आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या सध्या इतर शहरांमध्ये देखील नेटवर्क आणण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना हे माहित असणे खूप महत्वाचे आहे की कोणत्या नेटवर्कमुळे कशा प्रकारचे फायदे मिळू शकतात आणि त्यात काही वेगळे आहे का? रिलायन्स जिओ आणि एअरटेलची 5G रोलआउट संदर्भात वेगवेगळी रणनीती आहे. एअरटेलच्या 5जी आणि जिओच्या 5जीमध्ये काय फरक आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Airtel 5G vs Reliance Jio 5G
Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या 5G साठी वापरत असलेले तंत्रज्ञान वेगळे आहे. अनेक यूजर्स अनेक दिवसांपासून याबद्दल चर्चा करत आहेत. Jio आणि Airtel च्या 5G रोलआउट स्ट्रॅटेजी वेगळ्या आहेत. Jio 5G SA (स्टँडअलोन) लागू करत आहे, तर Airtel 5G NSA (नॉन-स्टँडअलोन) लागू करत आहे. 5G SA ला 4G कोरची आवश्यकता नाही आणि एक स्वतंत्र पायाभूत सुविधा आहे. 5G NSA 4G कोरवर अवलंबून आहे. दोघेही लक्षणीयरीत्या चांगली स्पीड देऊ शकतात, परंतु 5G SA वापरात अशा काही प्रकरणे सुरू करु शकतं ज्या 5G NSA करू शकत नाही.
Airtel 5G vs Jio 5G - शहरे
Airtel आणि Jio एकाच शहरांना लक्ष्य करत आहेत. जिओची 5G नेटवर्क सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी आणि चेन्नईसह 5 शहरांमध्ये उपलब्ध आहे. Jio नाथद्वारामध्ये मोफत 5G आधारित वाय-फाय सेवा देत आहे. एअरटेलची 5G नेटवर्क सेवा मुंबई, दिल्ली, वाराणसी, चेन्नई, सिलीगुडी, नागपूर, हैदराबाद आणि बंगळुरूसह 8 शहरांमध्ये उपलब्ध आहे. वर्षअखेरीस दूरसंचार कंपन्या आणखी शहरांमध्ये पोहोचतील अशी अपेक्षा आहे.
Airtel 5G vs Reliance Jio 5G - स्मार्टफोन सपोर्ट
Airtel आणि Reliance Jio चे 5G नेटवर्क आता देशातील बहुतेक 5G डिव्हायसेसना सपोर्ट करत आहेत. ज्या डिव्हाइसना सपोर्ट मिळत नाहीये त्यांना आधीपासूनच OTA (ओव्हर-द-एअर) अपडेट मिळत आहे किंवा लवकरच मिळणार आहे. त्यानंतर हे डिव्हाइस देखील भारतात 5G नेटवर्कला सपोर्ट करतील. भारतात 5G नेटवर्कला सपोर्ट करण्यासाठी iPhone ला अजून अपडेट मिळालेले नाही. Apple डिसेंबरमध्ये भारतीय बाजारात त्यांच्या डिव्हाइससाठी 5G साठी सपोर्ट लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.