भारतातील स्मार्टफोन मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ फ्लॅगशिप फोनच नाही, तर भारतातील कमी किमतीत मिळाणाऱ्या स्मार्टफोन्सची मागणी देखील मोठ्या प्रणाणात वाढली आहे. आजकाल, बजेट स्मार्टफोन्स चांगले कॅमेरे आणि त्याहूनही अधिक शक्तिशाली हार्डवेअर ऑफर करतात जेणेकरुन तुमच्या सर्व गरजा याच्यामाध्यमातून पूर्ण होतात. भारतातील टॉप बजेट फोन्स आता हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, हाय-रिझोल्यूशन मल्टी-कॅमेरा सेटअप, चांगले डिझाइन आणि पावरफुल सॉफ्टवेअर ऑफर करतात.
दिवाळीच्या मुहूर्तावर जर तुम्ही बहिणीसाठी किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीसाठी स्मार्टफोन गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करत असाल तर बाजारात असे अनेक ऑप्शन सध्या उपलब्ध आहेत. आज आपण तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेले आणि तुमच्या खिशाला देखील परवडतेल असे स्मार्टफोन्स पाहणार आहोत.
Samsung Galaxy M13 5G
Samsung Galaxy M13 5G हा तुमच्यासाठी चांगला 5G फोन ऑप्शन ठरू शकतो आहे. दिवाळी सेल्सच्या ऑफर्समध्ये तुम्ही तो आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकाल. ज्या लोकांना पुरेशी मोठी बॅटरी आणि डिस्प्लेची गरज आहे त्यांच्यासाठी हे डिव्हाइस योग्य ठरेल. यात 5,000mAh बॅटरी आणि HD+ रिझोल्यूशनवर चालणारी 6.5-इंच LCD स्क्रीन आहे.
हा बजेट सॅमसंग फोन Mediatek Dimensity 700 चीपसह देण्यात आला आहे. कंपनी बॉक्समध्ये याच्यासोबत 15W चा चार्जर देते. कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास किंमतीच्या मानाने चांगले फोटो मिळतील. Samsung Galaxy M13 5G ची भारतात किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला यात अनेक व्हेरिएंट वेगवेगळ्या किंमतीत पाहायला मिळतील.
Redmi Note 11T 5G
Redmi Note 11T 5G हा आणखी एक चांगला 5G स्मार्टफोन आहे जो तुम्ही 15,000 च्या खाली खरेदी करण्याचा विचार करू शकता. सॅमसंग गॅलेक्सी M13 प्रमाणेच ह्यामध्ये देखील न्य 5,000mAh बॅटरी आहे. परंतु, Xiaomi या फोनसोबत फास्ट 33W चार्जर देते आहे.
यात हाय रिझोल्यूशन आणि रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट असलेली 6.6-इंच स्क्रीन देखील आहे. स्क्रीन FHD+ रेझोल्यूशनवर चालते आणि अधिक स्क्रोलिंग एक्सपिरीएंससाठी 90Hz वर रिफ्रेश होते. हे MediaTek Dimensity 810 चिपसेटने सपोर्टेड आहे . डिझाइन खूपच आकर्षक आणि आधुनिक आहे. बिल्ड गुणवत्ता खूपच चांगली असून कॅमेरा देखील चांगला आहे. चांगल्या ऑडिओ आउटपुटसाठी हँडसेटमध्ये स्टिरिओ स्पीकर देखील आहेत. दरम्यान Redmi Note 11T 5G ची किंमत सध्या 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 14,999 रुपये आहे.
Poco M4 5G
जे 11,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत ते Poco M4 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. बजेट फोन मूळ गरजा पूर्ण करू शकतो यामध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. तसेच 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जसाठी सपोर्ट दिला आहे, जो सॅमसंग फोनपेक्षा चांगला आहे. कॅमेरा देखील त्याच ,तोडीचा मिळतो. 6.58-इंच फुल एचडी+ स्क्रीन मीडिया वापरण्यासाठी पुरेशी चांगली आहे.
iQOO Z6 Lite 5G
iQOO Z6 Lite 5G हा 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 5G फोन आहे. हा नवीन Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरसह येतो. डिव्हाइसमध्ये 120Hz डिस्प्ले आहे जो तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही फोनमध्ये मिळत नाही. हे यामध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. कंपनी दोन वर्षांचे मोठे अँड्रॉइड अपडेट्स तसेच तीन वर्षांचे सिक्युरिटी पॅच देण्याचे आश्वासन देत आहे. या फोनमध्ये तुम्हाला कॅमरा देखील बऱ्यापैकी ऑफर करण्यात आला आहे.
iQOO Z6 Lite 5G ची किंमत 13,999 रुपये आहे, परंतु Amazon तसेच इतर प्लॅटफॉर्मवर देण्यात येत असलेल्या डिस्काउंट ऑफरमध्ये तो आणखी स्वस्तात मिळेल.
Realme 9i
Realme 9i ने 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा स्मार्टफोन आहे. हा देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. यामध्ये 6.6-इंचाची FHD+ 90Hz स्क्रीन, एक Dimensity 810 SoC आणि 18W चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी मिळते. यामध्ये त्याच्या किंमतीच्या रेंजमध्ये बेस्ट कॅमेरा सेटअप मिळत नाही. तुम्हाला कॅमराच्या बाबतीत Samsung Galaxy M13 किंवा Redmi Note 11T फोनमध्ये यापेक्षा चांगला कॅमेरा मिळेल. Realme 9i 5G ची भारतात किंमत 14,999 रुपये आहे आणि हा फोन तुम्ही फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.