देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव आजपासून म्हणजेच, 26 जुलैपासून सुरू होत आहे.
5G Spectrum Auction : देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव आजपासून म्हणजेच, 26 जुलैपासून सुरू होत आहे. यासोबतच 5G इंटरनेट क्रांतीचीही सुरुवात होईल. 5 जीमुळं इंटरनेट स्पीड सध्याच्या स्पीडपेक्षा किमान 10 पट जास्त वाढेल. दूरसंचार क्षेत्रातील तीन कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या लिलाव प्रक्रियेत सहभागी होत आहेत.
याशिवाय, गौतम अदानी यांच्या कंपनीनंही आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी या लिलावात सहभागी होण्याची घोषणा केलीय. सध्या टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश न करण्याची त्यांची योजना आहे. तज्ज्ञांच्या मते, 5G इंटरनेटचा वेग 4G पेक्षा 10 पट आणि 3G पेक्षा 30 पट जास्त असेल. याशिवाय, मोबाईल इंटरनेटवरील लोडही कमी होईल. अधिकाधिक इंटरनेट उपकरणं कमी क्षेत्रात कनेक्ट होऊ शकतील आणि याचा वेगावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. 5G च्या मदतीनं पेमेंट सिस्टम अधिक मजबूत आणि वेगवान होईल.
याशिवाय, अनेक नवीन तंत्रज्ञानही समोर येणार आहे. येत्या काही दिवसांत इंटरनेट स्पीडमुळं ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीशी संबंधित व्हिडिओ पाहणंही शक्य होणार आहे. Jio, Airtel, Vodafone-Idea आणि Adani Group यांनी एकूण 21800 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जमा केलीय. या लिलाव प्रक्रियेत 72 GHz स्पेक्ट्रमचा समावेश केला जाईल, ज्याची वैधता 20 वर्षे असेल. त्याची किंमत 4.3 लाख कोटी रुपये असेल. Airtel, Jio आणि Vodafone Idea मिळून 71 हजार कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे.
लिलावामुळं ही प्रक्रिया दोन दिवस चालेल आणि स्पेक्ट्रमची विक्री राखीव किमतीच्या आसपास होईल, अशी उद्योगांना अपेक्षा आहे. स्पेक्ट्रम लिलावाच्या या फेरीत विद्यमान दूरसंचार सेवा पुरवठादार रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया व्यतिरिक्त, गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेस देखील 5G साठी बोली लावणार आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून दूरसंचार विभागाला 70,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. देशात 5G सेवा सुरू झाल्यानं हायस्पीड इंटरनेट सेवा देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 5G सेवा सध्याच्या 4G सेवांपेक्षा सुमारे 10 पट वेगवान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.