Independence Day : व्हॉट्सॲपवरून पाठवा स्वातंत्र्यदिनाचे स्टिकर आणि GIF

७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त व्हॉट्सॲपवर क्रिएटिव्ह स्टिकर्स आणि जीआयएफ वापरता येणार आहेत. यासाठी Google Play स्टोरमधून थर्ड पार्टी स्टिकर ॲप डाऊनलोड करावा लागेल.
Independence Day
Independence Dayesakal
Updated on

या वर्षी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२२ ला साजरा करणार आहे. व्हॉट्सॲप (WhatsApp) एक फेमस ॲप आहे. खूप लोक ते वापरतात. स्टिकरच्या माध्यमातून टाईप न करताच आपल्या भावना पोहचवल्या जातात. आतातर फारच क्रिएटिव्ह स्टिकर्स उपलब्ध आहेत. ईद, दिवाळी, ख्रिसमस आणि न्यू इयर सगळ्यासाठीच व्हॉट्सॲपवर स्टिकर्स उपलब्ध आहेत.

तुम्हीपण ७५ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी क्रिएटिव्ह स्टिकर्स आणि जीआयएफ वापरू शकतात. व्हॉट्सॲपने हे स्टिकर्स स्वतः काढलेले नाहीत तर Google Play स्टोरमधून थर्ड पार्टी स्टिकर ॲप डाऊनलोड करून वापरण्याची परवानगी दिली आहे.

Independence Day
भारतासह 'हे' पाच देश १५ ऑगस्टला साजरा करतात 'स्वातंत्र्यदिन'

स्टिकर्स आणि जीआयएफ कसे डाऊनलोड करावे

  • आपल्या Android फोनवर व्हॉट्सॲप उघडा

  • कोणताही चॅटबॉक्स उघडा

  • चॅटबॉक्सवर क्लिक करून इमोजी ऑप्शन उघडा.

  • आता "+" असे टाईप करा.

  • खाली स्क्रोल करून गेट मोअर स्टिकर्स ऑप्शन उघडा.

  • आता व्हॉट्सॲप तुम्हाला गूगल प्ले स्टोअर ला नेईल.

  • प्ले स्टोअर ला व्हॉट्सॲप स्टिकर पॅक सर्च करा

  • तुम्हाला तिथे खूप थर्ड पार्टी स्टिकर पॅक ॲप्स दिसतील. फोनमध्ये ॲप इन्स्टॉल करून घ्यावे.

  • ॲपवर आपल्या आवडीचे स्टिकर निवडावे.

  • तुम्ही निवडलेला स्टिकर पॅक व्हॉट्सॲप ॲपवर माय स्टिकर्स सेक्शनमध्ये येईल.

  • आता तुम्ही आपल्या आवडीचे स्टिकर्स आपल्या काँटॅक्ट्स, परिवार व मित्रांना पाठवू शकतात.

Independence Day
व्हॉट्सॲप स्टेटस देताना काळजी घेण्याचे आवाहन

जर तुम्ही मोबाईलमधून थर्ड पार्टी ॲप काढून टाकले तर व्हॉट्सॲप वरून हे स्टिकर्स पण निघून जातील.

व्हॉट्सॲप जीआयएफ कसे पाठवावे

  • आपल्या फोनमध्ये व्हॉट्सॲप उघडा

  • कोणतेही चॅट उघडा

  • GIF उघडा

  • Independence Day 2022 GIFs असे सर्च करा.

  • आपले आवडते जीआयएफ निवडून पाठवा.

Independence Day
Independence day : अशी करा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.