UPI Fraud : देशातील तब्बल ९५ हजार जणांना भोवली एकच चूक! ऑनलाईन पेमेंट करताना घ्या खबरदारी

विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांमध्ये ना यूपीआय अ‍ॅपची चूक होती, ना कोणाचं अकाउंट हॅक झालं होतं.
UPI Scam Alert
UPI Scam AlerteSakal
Updated on

देशात डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत यूपीआय पेमेंट वाढत आहे. मात्र, यासोबतच यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही वाढताना दिसून येत आहेत. २०२२ या वर्षात संपूर्ण देशात तब्बल ९५ हजारहून अधिक यूपीआय फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांमध्ये ना यूपीआय अ‍ॅपची चूक होती, ना कोणाचं अकाउंट हॅक झालं होतं. केवळ या यूजर्सच्या एका चुकीमुळे फसवणुकीच्या या घटना घडल्या. ही कोणती चूक होती, आणि तुम्ही कशा प्रकारे खबरदारी घ्यायला हवी, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

UPI Scam Alert
Online Payment : यूपीआय पेमेंट होणार आणखी सोपं, इंटरनेटशिवाय पाठवता येतील पैसे; RBI आणतंय नवीन सिस्टीम

यूपीआय पिन

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीआय पिन शेअर केल्यामुळे यातील सर्वाधिक फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याला वारंवार सांगण्यात येतं की आपला यूपीआय पिन शेअर करू नका. मात्र, कित्येक लोक तरीही ही चूक करतात.

कित्येक वेळा पैसे रिसीव्ह करण्याचं कारण सांगून लोकांना यूपीआय पिन मागितला जातो. मात्र, पैसे घेण्यासाठी तुम्हाला पिन देण्याची किंवा क्यूआर स्कॅन करण्याची गरज नसते. केवळ पैसे देतानाच तुम्हाला पिन एंटर करावा लागतो, हे लक्षात घ्या.

UPI Scam Alert
Google Pay : आता आधार नंबरच्या मदतीने बनवता येईल UPI अकाउंट; डेबिट कार्डची नाही गरज! पाहा कसं

कस्टमर केअर नंबर

कित्येक वेळा ट्रान्झॅक्शन करताना काही अडचणी येतात. अशा वेळी लोक गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधतात. मात्र, या माध्यमातूनही लोकांची फसवणूक होत आहे. गुन्हेगार चुकीचा कस्टमर केअर नंबर गुगलवर देतात, त्यामुळे अशा नंबरवर कॉल केल्यास आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुनच कस्टमर केअर नंबर घेणे गरजेचे आहे. अधिक खबरदारीसाठी बँकेच्या शाखेत जाणं उत्तम.

पब्लिक वायफाय

कित्येक वेळा फोनमध्ये इंटरनेट नाही म्हणून लोक सार्वजनिक ठिकाणी असलेले वायफाय वापरतात. मात्र, या माध्यमातून तुमचा फोन हॅक होण्याचा धोका असतो. फोन हॅक झाल्यास तुमचे बँकिंग डीटेल्सही हॅकर्स मिळवू शकतात. यामुळे असे वायफाय वापरताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. शक्यतो पब्लिक वायफाय वापरताना यूपीआय व्यवहार करणं टाळावं.

UPI Scam Alert
UPI Payment: UPI पेमेंटच्या संभाव्य धोक्यांपासून वाचायचं आहे? मग ही माहिती आधीच वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.