Car Will Burn : एक ठिणगी अन् गाडी होईल जळून खाक! तुम्ही देखील ही चूक करताय का?

कारमध्ये पेट्रोलची बाटली, कॅन भरून ठेवणं धोकादायक ठरू शकतं
Car Will Burn
Car Will Burnesakal
Updated on

Car Will Burn : बऱ्याचदा होतं असं की, आपण एखाद्या दूरच्या प्रवासाला निघालो की मध्येच गाडीतलं पेट्रोल, डिझेल संपेल अशी भीती वाटते. मग पेट्रोल पंप दिसेल, नाही दिसेल त्यापेक्षा गाडीत पेट्रोल, डिझेलचा कॅन भरून ठेवणं सोपं असा विचार करून बरेच जण हा पर्याय अवलंबतात. पण तुम्हीही असं करत असाल तर सावधान. कारमध्ये पेट्रोलची बाटली, कॅन भरून ठेवणं धोकादायक ठरू शकतं. यात तुमच्या कारला आग लागण्याचा धोका असतो.

नवीन ठिकाणी जाताना पेट्रोल पंप किती अंतरावर आहे हे कळत नाही. वाटेत पेट्रोल संपलं तर पेट्रोल पंपावर जाणार कसं? ही समस्या टाळण्यासाठी काही लोक गाडीत पेट्रोलच्या बाटल्या देखील ठेवतात. जर तुम्हाला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर हे करू नका. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल ठेवण्याचे मोठे धोके आहेत.

Car Will Burn
Vidarbha Travels Burned : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

एक ठिणगी आणि गाडी होईल जळून खाक

कार इग्निशन सिस्टमवर चालते, म्हणजे इंधनापासून आग तयार होते. या आगीतून ऊर्जा निर्माण होते आणि गाडी धावते. कारचे काही भाग असे आहेत की जिथे कधीही ठिणगी पडण्याचा धोका असतो. समजा तुमच्या गाडीत पेट्रोलची बाटली आहे आणि एखादी ठिणगी पडली तर काय होईल? साहजिकच पेट्रोलच्या बाटलीला आग लागू शकते.

Car Will Burn
Adventure Travel Tips : Cycle सोलो ट्रिप प्लॅन करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

भारताचे हवामान

दुसरे मोठे कारण म्हणजे भारत हा उष्कटिबंधीय देश आहे. येथील हवामान बहुतांशी उष्ण असते. पेट्रोल एक ज्वलनशील द्रव आहे, ज्याला लवकर आग लागते. आता एकीकडे प्रखर उष्णता आणि वर पेट्रोलची दाहकता, या दोन्ही गोष्टी मिळून तुमच्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. पेट्रोल साठवण्यासाठी प्लास्टिकची बाटली योग्य नाही.

Car Will Burn
Himachal Travel : हिमाचलच्या कुशीतली सुंदर नगीना; तुम्ही इथे भेट दिलीत का?

बाटल्यांमधील पेट्रोलवर बंदी आहे

प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून धूर म्हणजेच वाफ निर्माण करता येते. जास्त दाब वाढल्यास ही बाटली फुटू शकते. धूर आग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पेट्रोलच्या बाटल्या गाडीत न ठेवणेच चांगले. भारतात पेट्रोल पंपावर बाटल्यांमध्ये पेट्रोल देणेही बेकायदेशीर आहे. इंधन टाकी नेहमी पेट्रोल किंवा डिझेलने भरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.