Aadhaar Update Deadline : अलर्ट! आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी; घरबसल्या मिळवा फ्री सुविधा,वापरा सोप्या स्टेप्स

Aadhaar Update Your Demographic Details Now for Free : आधार कार्ड अपडेट करण्याची ही शेवटची मोफत संधी आहे. आधार कार्डच्या माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी शेवटची तारीख आली आहे.
Aadhaar Card Details Update for Free DDeadline Date is Here
Aadhaar Card Details Update for Freeesakal
Updated on

Aadhar Card Details Update : आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्म दिनांक, पत्ता यांसारख्या माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास ती दुरुस्त करण्याची संधी सध्या मोफत उपलब्ध आहे. पण लक्षात घ्या, ही संधी फक्त काही दिवसांसाठीच आहे.

आधार कार्ड आता अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी आवश्यक बनले आहे. शाळेत प्रवेश घेणे, नोकरी मिळवणे, बँक खाते उघडणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे या सर्व ठिकाणी आधार कार्ड लागते. जर तुमच्या आधार कार्डमध्ये एखादी चुकीची माहिती असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते.

आधार कार्ड जारी झाल्यावर 10 वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर ते देखील अपडेट करणे आवश्यक आहे. UIDAI (यूआयडीएआय) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत अपडेटची सुविधा ऑनलाईन पद्धतीसाठीच आहे. आधार कार्ड केंद्रावर जाऊन अपडेट करायाचे असल्यास 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

Aadhaar Card Details Update for Free DDeadline Date is Here
SC Verdict Phone Data Deletion : मोबाईलमधील मेसेज आणि डेटा डिलीट करणं अपराध? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,नेमकं प्रकरण काय?

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट कसे कराल?

  • UIDAI ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या.

  • 'My Aadhaar' या सेक्शन जा.

  • 'Update Your Aadhaar' या पर्यायावर क्लिक करा आणि खाली येणाऱ्या मेनूमधून 'Update Demographics Data and Check Status' निवडा.

  • तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. नंतर 'Send OTP' वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक वेळचा पासवर्ड (OTP) येईल.

  • प्राप्त झालेला OTP वापरून लॉग इन करा आणि ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे त्या माहितीच्या पेजवर जा.

Aadhaar Card Details Update for Free DDeadline Date is Here
Amazon Rufus Shopping Assistant : ॲमेझॉनमध्ये आला तुमचा पर्सनल AI असिस्टंट; शॉपिंगला बनवणार एकदम खास,कसं वापराल Rufus? एकदा बघाच
  • आवश्यक माहितीमध्ये बदल केल्यानंतर, ते जमा करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.

  • सर्व माहिती जमा केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक अपडेट रिक्वेस्ट आयडी येईल. या आयडीच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या अर्जामचा स्टेटस नंतर कधीही तपासू शकता.

आधार कार्ड अपडेट करण्याची ही शेवटची मोफत संधी आहे. म्हणून वेळ न घालवता लगेच तुमचे आधार कार्ड अपडेट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.