Aadhar Card Update Details Changes Limit : आधार कार्ड हे भारतातील अत्यावश्यक दस्तऐवज मानले जाते. त्याचा वापर विविध सरकारी आणि खासगी सेवांसाठी केला जातो. आधार कार्डावर काही महत्त्वाच्या गोष्टींचे बदल करण्याची मर्यादा आहे, तर काही गोष्टी अनेक वेळा अपडेट केल्या जाऊ शकतात. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार तपशील बदलण्यासाठी काही नियम ठरवले आहेत.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते बदल एकदा किंवा दोनदा करता येतील आणि कोणते अनेक वेळा करता येऊ शकतात.
आधार कार्डवर तुमचे नाव फक्त दोन वेळा बदलता येते. यात चूक सुधारणे किंवा लग्नानंतर आडनाव बदलणे यांचा समावेश आहे. त्यामुळे नाव बदलताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. (aadhaar card deatils update and rules)
आधार कार्डवर लिंग बदलण्याची फक्त एकच संधी दिली जाते. जर तुमच्याकडून लिंग बदलताना चूक झाली, तर ती पुन्हा सुधारता येणार नाही. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ही माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.
आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही वेळा पत्ता बदलू शकता, विशेषत: ज्यांची रहाण्याची जागा वारंवार बदलते, त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. पत्ता बदलण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाणी बिल, वीज बिल किंवा भाडे करारासारखी कागदपत्रं वापरू शकता. तसेच, तुम्ही आधार सेवा केंद्रालाही भेट देऊ शकता.(aadhaar card update)
आधार कार्डावर संवेदनशील माहिती जसे की नाव, लिंग, जन्मतारीख इ. अपडेट करताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. एक लहानशी चूक देखील तुम्हाला भविष्यात अडचणीत टाकू शकते. त्यामुळे कोणताही बदल करण्यापूर्वी सगळी माहिती नीट तपासून पाहा आणि नंतरच सबमिट करा. आधार अपडेट करताना या मर्यादा आणि नियमांचे पालन केल्यास भविष्यात त्रास टाळता येईल. (aadhaar card update limit)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.