५० रुपयांत घरपोच मिळवा तुमचे PVC आधार कार्ड; जाणून घ्या प्रोसेस

How to Order Aadhaar PVC Card
How to Order Aadhaar PVC CardSakal
Updated on

PVC Aadhaar card : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकल दुकानातून बनवलेले आधार PVC कार्ड (Aadhaar PVC card) अवैध घोषित केले आहेत. या दरम्यान UIDAI ने जारी केलेले ज्यामध्ये अनेक सुरक्षा विषयक बाबींची काळजी घेण्यात आली आहे, असे त्यांच्याकडून मागवलेले आधार PVC कार्डच वैध मानले जाणार आहेत. बाजारातून तयार केलेली पीव्हीसी आधार कार्ड असुरक्षित असून ती वापरू नयेत असे सांगण्यात आले आहे. UIDAI च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांचे आधार कार्ड (Aadhaar Card) अवैध ठरली आहेत. (How to Order Aadhaar PVC Card)

पीव्हीसी आधार कार्ड हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डची माहिती दिलेली असते. जे वापरण्यासाठी किंवा सोबत बळगण्यासाठी सोपे असते. UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, आधार कार्ड दिल्याची तारीख आणि कार्डची प्रिंट केल्याची तारीख आणि इतर माहिती देण्यात आलेली असते. एटीएम किंवा डेबिट कार्ड आकाराचे असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये नेणे सोपे जाते, त्यामुळे हे अनेक जण वापरतात.

How to Order Aadhaar PVC Card
UIDAI चा मोठा निर्णय; अनेकांचे आधार कार्ड होणार अवैध, जाणून घ्या कारण

फक्त 50 रुपयांमध्ये करा ऑनलाइन ऑर्डर

UIDAI कडून PVC आधार कार्ड मिळवणे खूप स्वस्त आहे. एका ट्विटमध्ये UIDAI ने म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती केवळ 50/- रुपये (PVC आधार कार्ड फी) (जीएसटी आणि स्पीड पोस्ट फीसह) भरून आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकते. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल.

How to Order Aadhaar PVC Card
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

ही आहे संपूर्ण प्रक्रिया (Steps to Apply Online PVC Aadhaar card)

  • UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.

  • येथे 'My Aadhaar' सेक्शनमध्ये जाऊन 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा.

  • तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) एंटर करा.

  • सुरक्षा कोड किंवा कॅप्चा एंटर करा.

  • OTP मिळवण्यासाठी Send OTP वर क्लिक करा.

  • रजीस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.

  • सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचे प्री-व्ह्यू दिसेल.

  • खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला पेमेंट पेज दिसेल

  • येथे 50 रुपये फी भरा.

  • तुम्ही पेमेंट करताच तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.

  • टपाल विभागाच्या स्पीड पोस्टद्वारे काही दिवसांनी पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल.

How to Order Aadhaar PVC Card
शाओमीच्या फोनवर बंपर ऑफर! मिळेल फ्री Mi Band 5, कॅशबॅक अन् बरंच काही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()