बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, पालकांची चिंता मिटली!

 Aadhar Card Updates For Newborn Babies
Aadhar Card Updates For Newborn Babies
Updated on

लहान बाळांच्या आधारकार्डसंबधीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बाळाच्या आधार कार्डबाबत पालकांची चिंता मिटविणारी नवी सुविधा देणार असल्याची माहिती UIDAI सीईओ सौरभ गर्ग यांनी सांगितले आहे. बाळाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल अशी योजना UIDAI बनवत आहे. ( Aadhar Card Updates For Newborn Babies)

UIDAI सीईओ सौरभ गर्ग यांनी आधारशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली. यासोबतच त्यांनी UIDAI च्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. ''युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया(UIDAI ) यासाठी एक नवीन योजना तयार करत आहे. नवजात बालकांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयांना देण्यात येणार आहे. त्यासाठी UIDAI बर्थ रजिस्ट्रारसोबत काम करेल. दरम्यान यासंदर्भात बोलणी सुरू आहेत.'' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 Aadhar Card Updates For Newborn Babies
देशातील बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 236 किमी पर्यंत धावतात

रुग्णालयात मिळणार आधार

गर्ग म्हणाले, 'भारतात रोज सुमारे 25 दशलक्ष बाळ जन्माला येतात. दरम्यान, UIDAI ची योजनेनुसार, रुग्णालयात जन्मलेल्या बाळाचा फोटो काढून त्याचवेळी आधार कार्ड तयार केले जाईल.

सध्या ५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचे आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाही, पण ५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास मुलांचे बायोमेट्रिक्स करणे बंधनकारक आहे.

 Aadhar Card Updates For Newborn Babies
'गहराइयां सिनेमा तुम्हाला पाहता येणार नाही जर...' सविस्तर वाचा

प्रादेशिक भाषेतही आधार बनवण्यात येणार

''आता लवकरच भारतात प्रादेशिक भाषांमध्येही आधार कार्ड तयार करण्या येईल. सध्या देशात आधार कार्डची माहिती फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये दिली जाते. पण लवकरच पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, उडिया, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आधार कार्डावर कार्डधारकाचे नाव आणि इतर तपशील दिसणार आहे.'' असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 Aadhar Card Updates For Newborn Babies
'व्हॅलेंटाईन डे'च्या मागची खरी गोष्ट काय आहे?

आधार कार्ड महत्त्वाचे दस्तऐवज

आधार कार्ड हे भारतातील एक आवश्यक कागदपत्रे समजले जाते.याशिवाय, आधार कार्ड हा फक्त ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि इतर लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डमध्ये आवश्यक माहिती असल्याने महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आता मुलांच्या अॅडमिशनसाठीही आधा कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.