Anil Kapoor in Time 100 AI Magazine : अभिनेता अनिल कपूर यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मर्यादांवर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मोठा गौरव मिळाला आहे. ते 'टाइम' मासिकातर्फे प्रकाशित होणाऱ्या जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सर्वात प्रभावशाली 100 जणांच्या यादीत समाविष्ट होणारे एकमेव भारतीय अभिनेता ठरले आहेत. ही आनंदाची बातमी अनिल कपूर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केली.
इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर करताना अनिल कपूर यांनी म्हटले आहे, "कृतज्ञतेने आणि नम्र अंतःकरणाने मी स्वतःला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याची दिशा घडवणाऱ्या दूरदर्शी लोकांच्या यादीत सामील झालेला पाहीतो. 'टाइम' मासिकाकडून मिळालेला हा सन्मान फक्त एक पुरस्कार नाही तर तंत्रज्ञानात आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातील माझ्या प्रवासावरचा विचार करण्याचा क्षण आहे. या प्रयत्नांना ओळख दिल्याबद्दल @time तुमचे आभार."
AI 2024 मधील TIME100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती ही शीर्ष 100 व्यक्तींची यादी आहे ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यादी चार श्रेणींमध्ये विभागली गेली आहे ज्यामध्ये नेते, कलाकार आणि विचारवंत, आणि विविध देश आणि पार्श्वभूमीतील व्यक्तींचा समावेश आहे. ज्या व्यक्तींना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, नेतृत्व आणि AI चे भविष्य घडवण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखले गेले आहे,अश्या व्यक्तींचा समावेश या यादीमध्ये केला जातो.
दिल्ली उच्च न्यायालयात कृत्रिम बुद्धिमत्तेविरुद्ध अनिल कपूर यांनी लढवलेल्या महत्त्वाच्या खटल्यामुळे त्यांचा या यादीत समावेश झाला आहे. त्यांनी त्यांच्या मालमत्ता हक्कांचे रक्षण करण्यासाठी खटला भरला होता. त्यांचे नाव, प्रतिमा, चेहरा, आवाज आणि इतर वैयक्तिक वैशिष्ट्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनधिकृत वापरापासून कायदेशीर संरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी होती.
या प्रतिष्ठित यादीत हॉलीवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इतर अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे.
यापूर्वी एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी सांगितले होते की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा "पूर्णपणे गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि व्यावसायिकदृष्ट्या चुकीच्या प्रकारे वापरला जाऊ शकतो."
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अनिल कपूर शेवटी 'फायटर' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार होते.अनिल कपूर यांना मिळालेला हा पुरस्कार भारतासाठी देखील महत्वाची बाब आहे. कारण कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे आणि आत्ता कृत्रिम बुद्धीमत्ता हे आधुनिक जगातील आघाडीचे क्षेत्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.