सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याने ऑडीची इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑडी ई-ट्रॉन (Audi e-tron) खरेदी केली आहे. हे कंपनीचे भारतातील पहिले इलेक्ट्रिक मॉडेल आहे. या वाहनाची किंमत सुमारे 1.14 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे हे वाहन फुल चार्ज करून 484 किमी पर्यंत धावू शकते. स्वत: अभिनेता महेश बाबूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कारच्या डिलिव्हरीचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनीही अभिनेत्याचा फोटो ट्विट केला आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये 95 kWh बॅटरी पॅक आणि ड्युअल मोटर सेटअप आहे. ते एकत्रित 402 bhp आणि 664 Nm पीक टॉर्क निर्माण करते. टॉर्कसह क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम या मोठ्या एसयूव्हीला फक्त 5.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग प्रदान करण्यास मदत करते.
महेश बाबून घेतलेली ऑडी ई ट्रॉन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 359-484 किमी पर्यंत चालते, असा दावा करण्यात आला आहे. कार 50 kW फास्ट चार्जरने 2 तासांपेक्षा कमी वेळेत 0-80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. SUV सोबत येणारा 11 kW चा AC चार्जर 8.5 तासात कार 0-80 चार्ज करू शकतो.
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही अनेक लक्झरी फिचर्सने सुसज्ज आहे. यामध्ये 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, 3D प्रीमियम साउंड सिस्टम, डायनॅमिक लाइट स्टेजिंगसह डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, हेड-अप डिस्प्ले आणि पॅनोरॅमिक सनरूफ इत्यादीचा समावेश आहे. कारमध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सेंटर कन्सोलवर ड्युअल टच स्क्रीनसह व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.