Aditya L1 : पुण्यात तयार झालंय 'आदित्य एल-1' मधील खास उपकरण; इस्रोच्या मोहिमेत 'आयुका'चा मोठा वाटा

सूर्याच्या निरीक्षणासाठी स्वदेशी वेधशाळेचे स्वप्न पुण्यातील शास्त्रज्ञांनी २०११-१२ मध्ये पाहिले होते
aditya l1 launch today solar mission explained iucaa isro science
aditya l1 launch today solar mission explained iucaa isro scienceeSakal
Updated on

पुणे : सूर्याच्या निरीक्षणासाठी स्वदेशी वेधशाळेचे स्वप्न पुण्यातील शास्त्रज्ञांनी २०११-१२ मध्ये पाहिले होते. तब्बल दशकभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी (ता. २) ‘आदित्य एल-१’ ही सौरवेधशाळा पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी अवकाशात झेपावत आहे.

प्रयत्नांची पराकाष्ठा आणि पराकोटीच्या संयमानंतर आमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याची भावना आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी व्यक्त केली. ‘आदित्य एल-१’ची संकल्पना आणि यातील एक उपकरण ‘आयुका’ने विकसित केले आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून शनिवारी ‘आदित्य एल-१’चे प्रक्षेपण होत आहे. यासाठी पुण्यातून जाण्यापूर्वी शास्त्रज्ञांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.

‘आयुका’तील प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी ‘इस्रो’च्या सहकार्याने सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपची (सूट) निर्मिती केली आहे. याबाबत माहिती देताना प्रा. रामप्रकाश म्हणाले, ‘‘आमचा आनंद हा शब्दांपलिकडचा आहे.

‘आयुका’मध्येच सौरवेधशाळेची संकल्पना विकसित झाली. सुरुवातीला पृथ्वीभोवती फिरणाऱ्या सौरवेधशाळेचा विचार होता. परंतु नंतर, ‘इस्रो’च्या मदतीने आजच्या वेधशाळेची संकल्पना समोर आली. कोरोना काळातही आमच्या शास्त्रज्ञांनी कार्यरत राहून ‘आदित्य एल-१’चे महत्त्वपूर्ण उपकरण विकसित केले. देशभरातील अनेक विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे.’

aditya l1 launch today solar mission explained iucaa isro science
Aditya L1 : 'आदित्य एल-1'चे काउंटडाऊन सुरू; कसं आणि कुठे पाहता येईल लाईव्ह? जाणून घ्या

त्रिपाठी म्हणाले, ‘‘संकल्पना ते प्रत्यक्ष उड्डाण हा ११ वर्षांचा कालावधी आहे. ‘आयुका’बरोबरच ‘इस्रो’च्या केंद्रातही ‘आदित्य-एल-१’च्या निर्मितीचे काम झाले आहे. आम्ही गेली दहा वर्षे ज्या उपकरणावर कार्य केले, ते आता प्रत्यक्ष स्थानावर जात असल्याचा खूप आनंद आहे.’’

‘आदित्य एल-१’चे आज प्रक्षेपण

श्रीहरीकोटा - भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम सुरु होण्यास काहीच तास शिल्लक राहिले असून आज (ता. २) ‘पीएसएलव्ही’ या प्रक्षेपकाद्वारे सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘आदित्य एल-१’ हे यान सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात झेपावणार आहे.

aditya l1 launch today solar mission explained iucaa isro science
Aditya L1 : 'आदित्य एल-1'चे काउंटडाऊन सुरू; कसं आणि कुठे पाहता येईल लाईव्ह? जाणून घ्या

आज दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी या मोहिमेची उलटगणती सुरु करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’तर्फे देण्यात आली. भारताची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी होऊन केवळ दहाच दिवस झाले असताना दुसऱ्या मोठ्या अवकाशमोहिमेला सुरुवात होत आहे. प्रक्षेपण केंद्रावर ‘पीएसएलव्ही’ यानाला आणण्यात आले असून सर्व चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. एल-१ या बिंदूपर्यंत जाऊन तेथून सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करणे आणि सौर वाऱ्यांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

अभियंता म्हणून नऊ वर्षे आम्ही ‘आदित्य-एल-१’च्या ‘सूट’ उपकरणावर काम केले आहे. प्रत्यक्ष जागेवर पोहोचून ‘आदित्य-एल-१’ पहिले छायाचित्र पाठवेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या नऊ वर्षांच्या मेहनतीचे चीज होईल.

- भूषण जोशी, ‘सूट’ उपकरणाचे अभियंता

‘आदित्य-एल-१’च्या ‘सूट’ उपकरणाच्या निर्मितीत अनेक विद्यापीठांचा सहभाग आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी यासंबंधीचे संशोधन आणि विश्लेषण केले आहे. ‘आयुका’बरोबरच त्यांचाही या यशात मोठा वाटा आहे.

- प्रा. डॉ. आर. श्रीआनंद, संचालक, आयुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()