Aditya L1 Mission : भारतापूर्वी कोणत्या देशांनी राबवल्यात सौर मोहिमा? कुणा-कुणाला मिळालं यश? जाणून घ्या

ISRO Sun Mission : भारताची सौर मोहीम 'आदित्य एल-1' लाँच होण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत.
Aditya L1 Mission
Aditya L1 MissioneSakal
Updated on

Aditya L-1 : भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम 'आदित्य एल-1' लाँच होण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी (2 सप्टेंबर) सकाळी 11:50 वाजता याचं प्रक्षेपण होईल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचं हे पहिलंच मिशन असणार आहे. यासाठी 'आदित्य' उपग्रहाला अंतराळात नेणारं PSLV रॉकेट लाँच पॅडवर सज्ज झालं आहे. तसंच, या मोहिमेची रंगीत तालीमही यशस्वीपणे पार पडली आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवर आदित्य हा उपग्रह ठेवण्यात येणार आहे. याठिकाणाहून सूर्याचा अधिक स्पष्टपणे आणि विनाअडथळा अभ्यास करणं शक्य होणार आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे.

Aditya L1 Mission
ISRO Solar Mission : सूर्याचं गुपित आदित्य एल-1 मुळे बाहेर येणार? भविष्यातील धोक्यांची आधीच मिळणार माहिती

भारतापूर्वी अमेरिका, जर्मनी आणि युरोपने सौर मोहिमा राबवल्या आहेत. या सर्व देशांनी मिळून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत 22 मिशन लाँच केले आहेत. यातील सर्वाधिक मोहिमा नासाने राबवल्या आहेत. तसंच पहिली सौर मोहीम देखील नासानेच राबवली होती.

नासाच्या किती मोहिमा

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने 1960 साली पहिल्यांदा सौर मोहीम लाँच केली होती. 'पायोनिअर-5' असं या मोहिमेचं नाव होतं. यानंतर नासाने आतापर्यंत तब्बल 14 सौर मोहिमा पाठवल्या आहेत. नासाने पाठवलेले 12 ऑर्बिटर सूर्याच्या भोवती विविध कक्षांमध्ये फिरत आहेत.

नासाचं 'पार्कर सोलार प्रोब' हे सध्या सूर्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रोबने सूर्याच्या भोवती आतापर्यंत 26 वेळा फेरी मारली आहे. मात्र, अजूनही त्याचा सूर्याच्या जवळ जाण्याचा प्रवास सुरूच आहे. एखादं यान सूर्याच्या किती जवळ जाऊ शकतं, हे पाहण्याचा प्रयत्न नासा यातून करत आहे.

Aditya L1 Mission
Aditya L1 Mission : सूर्याचा अभ्यास करणं सोपं काम नाही! 'आदित्य एल-1' समोर कोणती आव्हानं? जाणून घ्या

जर्मनी अन् युरोपच्या मोहिमा

जर्मनीने आतापर्यंत दोन सौर मोहिमा राबवल्या आहेत. जर्मनीमधील अंतराळ संशोधन संस्थेने नासासोबत पार्टनरशिप करुन या मोहिमा राबवल्या आहेत. यातील पहिली मोहीम 1974 साली राबवली होती, तर दुसरी 1976 साली. हेलिओस-ए आणि हेलिओस-बी अशी या मोहिमांची नावं होती.

तर, युरोपियन स्पेस एजन्सीने आतापर्यंत 4 मोहिमा राबवल्या आहेत. यातील तीन मोहिमा त्यांनी नासासोबत मिळून केल्या आहेत. तर, तीन मोहिमा स्वतंत्रपणे लाँच केल्या. यातील पहिली मोहीम 1994 साली पार पडली होती. तर, 2021 मध्ये ESAने सोहो नावाचं सोलार ऑर्बिटर लाँच केलं होतं. या ऑर्बिटरचा प्रवास अजूनही सुरू आहे.

Aditya L1 Mission
ISRO Sun Mission : 'आदित्य'सोबत जाणार 'PAPA' आणि इतर उपकरणे; सूर्याचा कशा प्रकारे करणार अभ्यास? जाणून घ्या

आतापर्यंत किती मोहिमा यशस्वी?

नासाने 1969 साली लाँच केलेलं पायोनिअर-ई ऑर्बिटर हे आपल्या ठरलेल्या कक्षेत पोहोचण्यास अयशस्वी ठरलं होतं. पूर्णपणे अयशस्वी ठरलेली ही आतापर्यंतची एकमेव सौरमोहीम आहे. तर, पूर्णपणे यशस्वी समजली जाणारी सौर मोहीम देखील नासानेच राबवली होती.

2001 साली लाँच केलेल्या Genesis यानाने सूर्याच्या भोवती फिरुन सौर-हवेचे सॅम्पल कलेक्ट केले होते. हे सॅम्पल घेऊन जेनेसिस यान पृथ्वीवर परत आलं. याची क्रॅश लँडिंग झाली होती, मात्र शास्त्रज्ञांना त्यातून सॅम्पल गोळा करण्यात यश मिळालं होतं.

Aditya L1 Mission
Aditya L1 : 'सूर्यावर' म्हणजे नेमका कुठे जाणार आदित्य उपग्रह?

याव्यतिरिक्त ESA ने 2008 साली नासासोबत मिळून राबवलेली उलिसस-3 ही मोहीम देखील काही प्रमाणात यशस्वी मानली जाते. याला कारण म्हणजे, या उपग्रहाने काही प्रमाणात डेटा पाठवण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर या उपग्रहाशी संपर्क तुटला. याव्यतिरिक्त इतर सर्व उपग्रह आणि ऑर्बिटर्स अजूनही आपल्या प्रवासात आहेत, किंवा डेटा पाठवत आहेत. त्यामुळे या मोहिमांना यशस्वीच म्हणता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()