Adventure bikes : तरुणांना वेड लावणाऱ्या ‘या' अ‍ॅडव्हेंचर बाईक्स तुम्हाला माहिती का?

लेह-लडाखच्या डोंगरदऱ्यातही आरामात चालणाऱ्या या रॉक्स अ‍ॅडव्हेंचर बाईक्स
Adventure bikes
Adventure bikes Esakal
Updated on

बाईक्स चालवणाऱ्या ग्राहकांची आवड लक्षात घेता बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही एकाहून एक सरस अ‍ॅडव्हेंचर बाईक्स आता लाँच केल्या आहेत.सर्व सामान्य लोकांच्या बजेटचा विचार करून लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी या बाईक अतिशय उपयुक्त आहेत.बाईक रायडिंगचा छंद आजकालची तरुणपिढी जोपासत आहेत. मागील काही वर्षांत अ‍ॅडव्हेंचर ट्रिप्सकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्याही बरीच वाढलीय. लेह-लडाखसारख्या डोंगरदऱ्याच्या प्रदेशात जात बाईकस्वारीचा मुक्तछंद आनंद घेणं हे तरुणाईसाठी एकप्रकारे फॅशनच बनली आहे.

तरुण मंडळीच्या पसंतीला उतरतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. बहुतेक जणांना त्या महागड्या गाड्या घेणं परवडत नाही. पण कमी किमत असलेल्या आणि डोंगर-दऱ्यात सहज पार करतील यअशा बाईकही सहज उपलब्ध आहेत. चला तर अशाच रॉक्स अ‍ॅडव्हेंचर बाईक्स या लेखातुन सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.

Adventure bikes
Bike offer : १० हजार भरा आणि खरेदी करा ही जबरदस्त बाइक

1.हिरो एक्सपल्स 200 (Hero XPulse 200): 

हिरो एक्सपल्स 200 ही परवडेल अशा किमतीतील अ‍ॅडव्हेंचर बाईक आहे. ही बाईक 199.6 cc एअर/ ऑइल कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन, 5 स्पीड ट्रान्समिशनसह येते. भारतात ही सर्वांत स्वस्त अ‍ॅडव्हेंचरबाईक असल्याचं मानलं जातं. 1.23 - 1.32 लाख रुपयांदरम्यान याची किंमत आहे.

2.होंडा सीबी 200x (Honda CB200X):ही बाईक 184.4 cc एअर कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आणि 5 स्पीड ट्रान्समिशनसह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रस्ता असेल तिथंच नव्हे तर जिथे रस्ता नाही अशा ठिकाणीही बाईकवर प्रवास करणं सोपं आहे. या बाईकच्या किमतींची सुरुवात 1.46 लाख रुपयांपासून होते.

Adventure bikes
Bike : फक्त २५ हजारांत मिळवा Hero bike

3. येझदी अ‍ॅडव्हेंचर (Yezdi Adventure):साहसी बाईक्समध्ये येझदी अ‍ॅडव्हेंचर हा एक उत्तम पर्याय आहे. या बाईकमध्ये 334 cc चे लिक्विड-कूल्ड (Liquid Cooled), सिंगल-पॉट इंजिन आहे. ही बाईक 6 स्पीड ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. साहसी प्रवास आवडणाऱ्या (Adventure Lover) व्यक्ती या बाईकला पसंती देतात. 2.10-2.19 लाखांदरम्यान या बाईकची किंमत आहे.

4. सुझुकी व्ही-स्टॉर्म SX (Suzuki V-Strom SX):

अ‍ॅडव्हेंचर ट्रिपसाठी सुझुकी व्ही-स्टॉर्म SX एक उत्तम पर्याय आहे. 249 cc चं ऑइल-कूल्ड इंजिन, सिंगल सिलिंडर, 6 स्पीड ट्रान्समिशनसह ही बाईक उपलब्ध आहे. या बाईकवर लांब पल्ल्याचा प्रवास करणं ही एक पर्वणी आहे. 2.12 लाखांपासून या बाईकची किंमत आहे.

Adventure bikes
EV bike : १ रुपयात ५ किमी चालेल ही स्कूटर; फक्त १० हजारांत आणा घरी

5. रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan): भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बाईकमध्ये सर्वांत आधी रॉयल एनफिल्डचं नाव घेतलं जातं. या बाईकमध्ये 411 cc चं एअर-कूल्ड इंजिन, सिंगल सिलिंडर उपलब्ध आहे. ही बाईक 5 स्पीड ट्रान्समिशनसह येते. या बाईकचा रेट्रो लूक पाहताक्षणी ही बाईक डोंगर-दऱ्यांच्या प्रवासासाठीच बनली असल्याचं कळतं. 2.15-2.22 लाख रुपयांपासून बाईकच्या किमतीची सुरुवात होते.तर मग जर तुम्हीही हिमालयात फिरायला जायचा विचार करत असाल तर यापैकी एखादी बाईक घेऊन राईड करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.