Best CNG Car: 'या' स्वस्त CNG कार देतात ३० पेक्षा जास्त मायलेज; किंमत देखील कमी

affoardable car these three best cng cars with best mileage know all details
affoardable car these three best cng cars with best mileage know all details
Updated on

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक अधिकाधिक सीएनजी वाहनांकडे वळत आहेत. कार खरेदी करणारा प्रत्येक ग्राहक मायलेजचा विचार करतो. म्हणूनच आज आपण अशाच काही CNG गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या 30 पेक्षा जास्त मायलेज देतात आणि त्यांची किंमतही खूप कमी आहे.

मारुती सुझुकी अल्टो

मारुती सुझुकी अल्टो सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत 31.59 किमी/किलोग्राम इतके मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो हे कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. या हॅचबॅकला 0.8-लिटर इंजिन मिळते जे CNG द्वारे चालवल्यावर 40PS पॉवर आणि 60 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. अल्टो हॅचबॅकच्या CNG व्हेरियंटची किंमत 5.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

affoardable car these three best cng cars with best mileage know all details
PAK vs ZIM Mr Bean Rivelary: अखेर झिम्बाब्वेने 'मिस्टर बीन'चा बदला घेतलाच! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी सेलेरियो CNG पेट्रोल व्हेरिएंट 21.63 kmpl च्या तुलनेत 30.47 kmpl मायलेज देते. Maruti Suzuki Celerio CNG हॅचबॅक 1.0-लिटर इंजिनसह येते जे 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क निर्माण करते. त्याची किंमत 6.68 लाख (एक्स-शोरूम) आहे.

affoardable car these three best cng cars with best mileage know all details
Tata Airbus Project: 'आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी...'; आदित्य ठाकरे संतापले

सीएनजी वॅगनआर

वॅगनआर दोन पेट्रोल इंजिन आणि एक सीएनजी पर्यायांसह उपलब्ध आहे. CNG WagonR मध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर इंजिन आहे जे 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क निर्माण करते. मारुती सुझुकी वॅगनआर ही बर्‍याच काळापासून ब्रँडची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. CNG व्हेरिएंट 32.52 किमी/किलो मायलेज देते .CNG WagonR ची किंमत 6.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()