बाईक इतके मायलेज देतात 'या' सीएनजी कार, पाहा किंमत आणि फिचर्स

Hyundai Santro CNG
Hyundai Santro CNGGoogle
Updated on

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांच्या खिशावार अतिरीक्त ताण पडत आहे. अशा परिस्थितीत, कार चालकांना प्रवास करताना पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे बरेच लोक अशा कार शोधत आहेत ज्या चालवणे खिशाला परवडेल आणि अशा कारमध्ये इलेक्ट्रिक कारनंतर सीएनजी कार एक चांगला ऑप्शन ठरु शकतात. सीएनजी कार इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत स्वस्त आहेत तसेच त्या चालवण्याचा खर्च देखील पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत जवळपास अर्धी आहे. जर तुम्ही देखील कमी किंमतीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोणत्या सीएनजी कार खरेदी करू शकता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मारुती सुझुकी अल्टो सीएनजी (Maruti Suzuki Alto CNG)

देशातील सर्वात स्वस्त सीएनजी मारुती सुझुकी अल्टो ही आहे, आज देखील या सीएनजी कारला बाजारात प्रचंड मागणी आहे .या कारमध्ये 0.8 लीटर इंजन देण्यात आले आहे, जे 60 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. जर आपण मायलेज बद्दल बोलायचे झाले तर कोणत्याही बाईक प्रमाणे, ही एंट्री लेव्हल हॅचबॅक सीएनजी 31.59 किमी/किलोमिटरचे जबरदस्त मायलेज देते. अल्टो सीएनजीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची किंमत 4,76,500 लाख रुपयांपासून सुरु होते.

ह्युंदाई सँट्रो सीएनजी (Hyundai Santro CNG)

ह्युंदाई सँट्रो ही सीएनजी कार तुम्ही 5,99,900 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या कारमध्ये तुम्हाला 1086 सीसी 4-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे आणि कार 68.7 बीएचपी आणि 99.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा दावा आहे की ही हॅचबॅक सीएनजीवर 30 किमी/किलोमीटर मायलेज देईल. या व्यतिरिक्त, आपण सीएनजीमध्ये ह्युंदाईची ग्रँड आय 10 निओस देखील खरेदी करू शकता. या कारची किंमत सुमारे 6,99,710 लाखांपासून सुरू होते.

Hyundai Santro CNG
Amazon-Flipkart सेलमध्ये 'हे' आहेत सर्वात स्वस्त स्मार्टफोन

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता मारुती सुझुकीची वॅगनआर हा देखील सीएनजी कार खरेदी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 1.0-लिटर 3-सिलेंडर इंजिनद्वारे चालविली जाते मॅक्झिमम 57 PS आणि 78 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज CNG वर 32.52 किमी/किलोमिटर आहे. ही कार एलएक्सआय आणि एलएक्सआय (ओ) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 5,83,000 रुपयांपासून सुरु होते.

Hyundai Santro CNG
5 ते 10 लाख रुपयांमध्ये पेट्रोल कार शोधताय? हे आहेत टॉप ऑप्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.