भारतात बजेट स्मार्टफोन्सना भरपूर मागणी आहे. जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोन शोधत असाल तर भारतीय बाजारपेठेत या किंमततीत बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये कमाल 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. या सर्व स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स प्रत्येक स्मार्टफोननुसार वेगवेगळे आहेत. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार स्मार्टफोन निवडू शकतात. चला या स्मार्टफोन्सची संपूर्ण यादी पाहूया
Infinix Hot 10s
किंमत – 9,999 रुपये
Infinix Hot 10S स्मार्टफोन 1640×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.82-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात येतो, त्याचा रिफ्रेश रेट 90Hz दिला आहे. या डिवाइस मध्ये octa-core MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला असून याशिवाय यूजर्सना फोनमध्ये Android 11 आधारित XOS 7.6 ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट मिळेल.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला 48MP प्राथमिक सेन्सर, दुसरा 2MP डेप्थ सेन्सर आणि तिसरा AI आधारित लेन्स आहे. तर या फोनच्या फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Hot 10S स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme C11
किंमत - 9,390 रुपये
Realme C11 2021 स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझॉल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे, या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर 89.9 टक्के आणि रीफ्रेश रेट 60Hz आहे. यात 1.6GHz ऑक्टा-कोर UniSoC SC9863 प्रोसेसर सपोर्ट दिलेला आहे. फोनमध्ये सिंगल 8MP कॅमेरा असून त्याचे अपार्चर f/2.0 आहे. तर या फोनच्या फ्रंटला 5MP सेल्फी कॅमेरा मिळेल. Realme C11 2021 स्मार्टफोन Android 11 आधारित Realme UI Go Edition ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला नाही. याशिवाय, यूजर्सना स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
Tecno Spark 8T
किंमत - 8,999 रुपये
Spark 8T मध्ये मोठा 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची पीक ब्राइटनेस 500 nits असून फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो 91.3% आहे. Spark 8T हा त्याच्या सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो 50MP ड्युअल एआय रिअर कॅमेरे आणि क्वाड फ्लॅश लाइटसह सादर केला गेला आहे. Spark 8T चा मागील कॅमेरा F1.6 अपर्चर सह उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 एमपी कॅमेरा आहे. Spark 8T स्मार्टफोनमध्ये 2.3GHz ऑक्टा-कोर Helio G35 गेमिंग प्रोसेसर दिले आहे. हे Android 11 वर आधारित HiOS 7.6 सह येते. Spark 8T मध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळते.
Redmi 9
किंमत - 9,499 रुपये
Redmi 9 स्मार्टफोन 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले सोबत येतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे इंटरनल स्टोरेज SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. त्याच वेळी, हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित MIUI 12 वर काम करतो. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये पहिला 13MP प्रायमरी सेन्सर आणि दुसरा 2MP सेंसर आहे. तसेच या फोनच्या फ्रंटला 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.
Realme Narzo 30A
किंमत -8,999 रुपये
कंपनीने Realme Narzo 30a स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा मिनी ड्रॉप एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720x1,600 पिक्सेल आहे. त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 88.7 टक्के असून यासोबतच स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा डिव्हाइस Android 10 आधारित Realme UI वर काम करते. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला 13MP प्रायमरी सेन्सर आणि दुसरा मोनोक्रोम लेन्स आहे. फोनमध्ये 6,000mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग तसेच रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.