TECNO ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Tecno Spark 8c भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की, Tecno Spark 8c हा 6GB रॅम आणि 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की Tecno Spark 8c मध्ये प्रत्यक्षात फक्त 3 GB RAM आहे, परंतु याला अपडेटद्वारे 3 GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, त्यानंतर एकूण 6 GB RAM असेल सोबत यात ऑक्टा-कोअर प्रोसेसरही दिले आहे.
टेक्नो स्पार्क 8C ची किंमत
TECNO SPARK 8C ची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे मॅग्नेट ब्लॅक, आयरिस पर्पल, डायमंड ग्रे आणि टर्क्युईज सायन कलरमध्ये खरेदी करता येईल. फोनची विक्री 24 फेब्रुवारी 2022 पासून Amazon.in वरून होईल.
TECNO SPARK 8C चे स्पेसिफिकेसन्स
फोनमध्ये Android 11 वर आधारित HiOS 7.6 आहे. TECNO SPARK 8C मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 480 nits आहे. यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, ज्याच्या मॉडेलबद्दल कंपनीने माहिती दिलेली नाही. हा फोन मेमरी फ्यूजन फीचरसह येतो. यात 6 GB RAM (3 GB व्हर्च्युअल रॅम ) सह 64 GB स्टोरेज दिले आहे.
TECNO SPARK 8C चा कॅमेरा
TECNO च्या या फोनमध्ये 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. एआय ब्युटी 3.0, पोर्ट्रेट मोड, वाईड सेल्फी, एचडीआर, फिल्टर्स असे अनेक मोड कॅमेरासोबत उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. फोनमध्ये IPX2 स्प्लॅश रेजिस्टंट , DTS साउंड, सोप्ले 2.0, HiParty, अँटी ऑइल स्मार्ट फिंगरप्रिंट, फेस अनलॉक, ड्युअल 4G VoLTE सह 3-इन-1 सिम स्लॉट दिला आहे. हा फोन मॅग्नेट ब्लॅक, आयरिस पर्पल, डायमंड ग्रे आणि टर्क्युईज सायन कलरमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली असून स्टँडबाय 89 दिवस आणि टॉक-टाइम 53 तासांपर्यंत मिळेल असा दावा केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.