AI Smell Sense : आता मशीन घेऊ शकणार सुगंध? जगभरातील संशोधक प्रयत्नात

Machine Learning : "रॅण्डम फॉरेस्ट" नावाची पारंपारिक मशीन लर्निंग पद्धत ठरली सर्वांत यशस्वी
From Pixels to Perfume AI’s Journey to Scent Detection.
From Pixels to Perfume AI’s Journey to Scent Detection.esakal
Updated on

Artificial Intelligence : आज आपल्या सर्वांच्या खिशात असलेल्या स्मार्टफोनमध्ये आवाज ओळखणारे सहाय्यक, चेहऱ्याची ओळख आणि फोटो सुधारणा अशी अनेक कौशल्ये आहेत. मात्र सुगंध ओळखणे अजूनही तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेर आहे. पण ही गोष्ट लवकरच बदलणार असल्याचे संकेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सुगंध ओळखण्याची क्षमता येऊ शकते.

हे आव्हान खूप मोठे आहे. कारण आपण जगाचा अनुभव डोळ्यांनी (रॉड्स आणि तीन प्रकारचे कोन्स) घेतो. पण सुगंध मात्र नाकातील सुमारे ४०० प्रकारच्या रिसेप्टर सेल्सच्या माध्यमातून ओळखला जातो.

From Pixels to Perfume AI’s Journey to Scent Detection.
Whatsapp New Feature : व्हॉट्सअपने व्हॉइस स्टेटसचं फिचर केल अपग्रेड,आता वाढणार टाईम लिमिट

मशीन सुगंध ओळखण्याची सुरुवात हवेतील सुगंधाचे रेणू शोधणार्‍या आणि ओळखणार्‍या संवेदकांपासून होते. ही संवेदक आपल्या नाकातील रिसेप्टर्ससारखीच कामे करतात. पण फक्त सुगंध ओळखणे पुरेसे नाही. या सुगंधाचा अर्थ काय आहे तेही संगणाला समजले पाहिजे. म्हणूनच मशीन लर्निंगचा वापर केला जातो.

मशीन लर्निंगच्या मदतीने विशिष्ट रेणूंच्या आधारे येणारा सुगंध ओळखू शिकतो. उदाहरणार्थ, व्हॅनिलीनसारख्या रेणूंमुळे येणारा गोड सुगंध ओळखण्यासाठी "गोड" किंवा "मिठाई" सारखे शब्द ओळखवले जातात.

पण यासाठी मोठ्या प्रमाणात माहितीची आवश्यकता असते. आपण दृश्य आणि आवाज सहज ओळखून सांगतो पण सुगंधाचे वर्णन करणे कठीण असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डाटा उपलब्ध नसल्यामुळे आधी मशीन लर्निंग मॉडेल्स प्रभावी ठरत नव्हती.

परंतु २०१५ मध्ये एका स्पर्धेनंतर परिस्थिती बदलली. या स्पर्धेत सुगंधाचा अभ्यास करणार्‍या जीवशास्त्रज्ञांनी रेणूंची आणि त्यांच्या सुगंधाची माहिती दिली आणि जगभरातील संघांना त्यांचे मशीन लर्निंग मॉडेल्स सादर करायला सांगितले. या मॉडेल्सने रेणूंच्या आधारे "गोड," "फूल" किंवा "फळ" सारखे सुगंध ओळखायचे होते.

From Pixels to Perfume AI’s Journey to Scent Detection.
Truecaller Voice Assistant : तुमचे कॉल उचलणारा पर्सनल असिस्टंट आता मोबाईलमध्ये ; ट्रुकॉलरने आणलंय 'हे' नवीन फिचर

२०१७ मध्ये या स्पर्धेतील सर्वात यशस्वी मॉडेल्स "सायन्स" या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. त्यात आश्चर्य म्हणजे "रॅण्डम फॉरेस्ट" नावाची पारंपारिक मशीन लर्निंग पद्धत सर्वात यशस्वी ठरली.

हे यश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील मोठी झेप आहे. संगणकांना सुगंध ओळखता येण्याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, अन्नपदार्थांची गुणवत्ता, औषधांची शुद्धता, वायु प्रदूषण ओळखणे इत्यादी अनेक क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.