Cobotic Chefs : आता शेफची गरज संपली? AI बनवणार टॉप क्लास डिशेस! IIT बॉम्बेच्या तरुणांचा शोध

या एआय सॉफ्टवेअरमुळे किचनमधील शेफची गरज नाहीशी होणार आहे.
Cobotic Chefs : आता शेफची गरज संपली? AI बनवणार टॉप क्लास डिशेस! IIT बॉम्बेच्या तरुणांचा शोध
Updated on

जगभरात कित्येक रेस्टॉरंटमध्ये सध्या रोबोट वेटर्स असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. असं असलं, तरी किचनमध्ये शेफची गरज भासत होतीच. मात्र, हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. कारण चक्क टॉप शेफप्रमाणे डिशेस बनवणाऱ्या एआयचा (AI Chef) शोध लावण्यात आला आहे. हे एआय किचनमधील कर्मचाऱ्यांना सूचना देऊ शकणार आहे, ज्यामुळे किचनमधील शेफची गरज नाहीशी होणार आहे.

IIT बॉम्बेमधून पासआऊट झालेल्या तीन तरुणांनी हे एआय सॉफ्टवेअर तयार केलं आहे. कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलिमध्ये त्यांनी स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं आहे. याचंच दुसरं ऑफिस मुंबईमध्येही आहे. आतिश अलूर, निखील अब्राहम आणि मोहित शाह या तिघांनी हे सॉफ्टवेअर तयार केलं आहे.

Cobotic Chefs : आता शेफची गरज संपली? AI बनवणार टॉप क्लास डिशेस! IIT बॉम्बेच्या तरुणांचा शोध
CarynAI : या तरुणीचा एआय क्लोन बनणार तुमची गर्लफ्रेंड; एका मिनिटासाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

कसं काम करतं एआय?

या सॉफ्टवेअरची चाचणी करण्यासाठी कंपनीने काही शेफना मुंबईत बोलावलं. याठिकाणी असलेल्या कोबॉटिक टेस्ट किचनमध्ये (Cobotic Chef in AI Kitchen) हे शेफ आपली स्पेशल डिश बनवतात. या किचनमध्ये डिश बनवतानाची सर्व प्रोसेस रेकॉर्ड केली जाते. पदार्थांचं वजन, तापमान, पाण्याचे प्रमाण, पॅनमधील पाणी किती उकळलं अशा सर्व गोष्टींची नोंद घेतली जाते.

हा सर्व डेटा कोडिफाय करून कॅलिफोर्नियातील पालो अल्टो इथं पाठवला जातो. याठिकाणी असलेल्या प्रॉडक्शन किचनमध्ये असलेला कम्प्युटर तेथील कर्मचाऱ्यांना डिश बनवण्याच्या सूचना देतो. या सूचनांना फॉलो करून तेथील कर्मचारी डिश बनवतात.

दोन्हीकडील डिशेस अगदी अचूक असाव्यात यासाठी डिशमध्ये लागणारे सर्व इंग्रिडियंट्स हे अमेरिकेतून मागवण्यात येतात. शिवाय, प्रॉडक्शन किचनमधील सर्व यांत्रिक उपकरणं ही कम्प्युटरने नियंत्रित केली जातात.

Cobotic Chefs : आता शेफची गरज संपली? AI बनवणार टॉप क्लास डिशेस! IIT बॉम्बेच्या तरुणांचा शोध
AI Fraud : व्हिडिओ कॉलवर AI फेस स्वॅप करून ५ कोटींची फसवणूक, काय आहे प्रकरण?

अगदी सेम-टू-सेम डिश

कोलकातामधील प्रसिद्ध खाद्य-इतिहासकार, पत्रकार आणि शेफ असणाऱ्या पृथा सेन यांच्या दोन डिशेस एआयच्या माध्यमातून रिक्रिएट करण्यात आल्या. आपल्या डिशेस जशाच्या तशा बनवल्याचं पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

या डिशेस केल्या तयार

या एआयने आतापर्यंत 35 डिशेस तयार केल्या आहेत. यामध्ये चलापती राव यांची बगारा बैगन, अक्षय पुरोहित यांची वॉलनट हलवा टार्ट, शेरी मेहता यांची मुलतानी मोठ दाल कचोरी, थॉमस झाचारियास यांची अम्मिनीज डक करी अशा डिशेसचा समावेश आहे.

यासोबतच अव्होकॅडो पापडी चाट आणि चिकन घी रोस्ट या डिशेसही एआयच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहेत. या डिशेस कॅलिफोर्नियामध्ये फूड डिलिव्हरी अ‍ॅप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून विकल्या जात आहेत.

Cobotic Chefs : आता शेफची गरज संपली? AI बनवणार टॉप क्लास डिशेस! IIT बॉम्बेच्या तरुणांचा शोध
Useful AI Apps : प्रत्येक मोबाइलमध्ये असायला हव्यात या AI अ‍ॅप्लिकेशन्स, तासांची कामं मिनिटांत होणार

या सॉफ्टवेअरमुळे आपल्या खास रेसिपींचं अचूक रेकॉर्ड ठेवणं शक्य होणार आहे. तसंच, शेफनाही नवनवीन रेसिपींवर काम करण्यासाठी वेळ मिळेल, असं मत काही पाककला तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()