Tech Tips : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वाधिक चर्चेत आहे. हल्ली त्याचा प्रभाव स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरही दिसून येतो. कंपन्या अत्याधुनिक सुविधा देण्याच्या मोहपाशात आपला डाटा गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.
मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दिग्गज कंपन्या एआयच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या मते एआय हेच भविष्यातील कम्प्युटिंगचे स्वरूप आहे. या फोनमध्ये असलेले एआय आपोआप फोटो एडिट करेल, नोट्स घेईल, वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवेल आणि आपल्या कामांमध्ये मदत करेल. पण या सोयीचा मोबदला म्हणजे आपला डाटा आहे.
मायक्रोसॉफ्टच्या नवीन फीचरमुळे तुमचे वेब ब्राउझिंग, नोटपॅड आणि सोशल मीडियावरील माहिती स्क्रीनशॉट स्वरुपात जतन होईल. त्यामुळे भविष्यात तुम्हाला या माहितीची गरज पडल्यास ती सहज उपलब्ध होईल.
गुगलनेही अँड्रॉइडवर फसव्या कॉलपासून वाचवण्यासाठी नवीन फीचर आणले आहे. यात तुमच्याशी फोनवर बोलणारा व्यक्ती जर तुमची वैयक्तिक माहिती मागेल तर गूगल तुम्हाला या फसव्या कॉलबद्दल इशारा देईल. पण यासाठी तुम्हाला गूगलला तुमच्या सर्व कॉलची परवानगी द्यावी लागणार आहे.
अशीच गोष्ट ऍपलचीही आहे. त्यांनी आयफोनमध्ये एआय इंटेलिजन्स नावाने फीचर आणले आहे. हे फीचर तुमच्या सर्व अॅप्सचा डाटा एकत्रित ठेवेल. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या विशिष्ट दिवशी मीटिंग ठरवली तर तुमच्या आधीच काही योजना असल्याचे आणि या मीटिंगमुळे त्यावर परिणाम होईल हे तुमच्या फोनवर दिसून येईल.
या सुविधा आकर्षक असल्या तरी त्यांची किंमत म्हणजे तुमचा वैयक्तिक डाटा आहे. एआय सतत शिकत असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात माहितीची गरज असते. ही माहिती तुमच्या फोनमधून न मिळाल्याने कंपन्या क्लाउडचा वापर करतात. एकदा तुमची माहिती क्लाउडवर गेली की ती सुरक्षित राहण्याची शाश्वती नाही. कंपन्या डाटा सुरक्षित असल्याचे सांगत असल्या तरी तो कर्मचारी, सरकारी संस्था किंवा हॅकर्स सहज पाहू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, डिव्हाइसबाहेर जाणारा कोणताही डाटा हा फार कमी सुरक्षित असतो. त्यामुळे कंपन्यांनी वापरकर्तांच्या गोपनीयतेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.