AI Death Prediction : तुमचा मृत्यू कधी होणार हेदेखील सांगणार 'एआय'; डेन्मार्कमधील टेक्निकल युनिवर्सिटीचा शोध

तुमचे हेल्थ रेकॉर्ड, शिक्षण, वय, पद आणि उत्पन्न या डेटाचा वापर करुन, तुम्ही आणखी किती वर्षे जगू शकता याचा अचूक अंदाज हे टूल करु शकतं.
AI Tool that Predicts Death
AI Tool that Predicts DeatheSakal
Updated on

AI Tool that Predicts Death : डेन्मार्कमधील टेक्निकल युनिवर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक खास एआय टूल तयार केलं आहे. बाकी एआय टूल्स तुम्हाला गणित, विज्ञान किंवा इतर विषयांतील प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. मात्र, या संशोधकांनी तयार केलेलं एआय टूल हे चक्क तुमचा मृत्यू कधी होणार याचा अचूक अंदाज बांधू शकतं.

Life2vec असं या एआय टूलचं नाव आहे. चॅटजीपीटी (ChatGPT) या एआयवर आधारित हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल आहे. तुमचे हेल्थ रेकॉर्ड, शिक्षण, वय, पद आणि उत्पन्न या डेटाचा वापर करुन, तुम्ही आणखी किती वर्षे जगू शकता याचा अचूक अंदाज हे टूल (AI Tool) करु शकतं, असं संशोधकांनी सांगितलं आहे.

78 टक्के अचूकता

संशोधकांनी या एआय (Artificial Intelligence) टूलला एका व्यक्तीचा 2008 ते 2016 दरम्यानचा डेटा पुरवला. यानंतर एआय टूलने या डेटामधील पॅटर्न तपासले. यानंतर आपल्या अल्गोरिदमच्या मदतीने ही व्यक्ती 2020 साली मृत पावली असती की नाही हे एआयला शोधण्यास सांगण्यास आले. यासाठी मृत व्यक्तींच्या डेटाचा वापर करण्यात आला. (78 percent accuracy)

AI Tool that Predicts Death
NASA Cat Video : नासाने अंतराळातून पाठवला मांजराचा व्हिडिओ; मानवाला मंगळावर जाण्यासाठी होणार याची मदत

या एआय टूलने व्यक्तीच्या तब्येतीबाबत आणि मृत्यूच्या तारखेबाबत 78% अचूक अंदाज (Death Prediction AI) सांगितला. एवढंच नाही, तर मरताना या व्यक्तीकडे किती पैसे असतील हेदेखील या एआय टूलने सांगितलं. 35 ते 65 वर्षे वयोगटातील काही नागरिकांची चाचणी या माध्यमातून करण्यात आली. यातील अर्ध्यांचा आधीच मृत्यू झाला होता.

कसा दिला डेटा?

संशोधकांनी आधी प्रत्येक गोष्टीला कोड नेमले. उदाहरणार्थ S52 हा कोड तुटलेला हात दर्शवतो, 072 हा कोड एखादा आजार दर्शवतो, किंवा मग POS3513 हा कोड कम्प्युटर टेक्निशियन या जॉब प्रोफेशनसाठी वापरण्यात येतो. अशाच प्रकारे सर्व व्यक्तींचा शक्य तेवढा डेटा या एआय टूलला देण्यात आला. यानंतर या टूलने डेटाचा अभ्यास करुन अंदाज व्यक्त केले. (How is the data given?)

AI Tool that Predicts Death
AI Krutrim : ओलाच्या सीईओंनी लाँच केलं भारताचं पहिलं एआय प्लॅटफॉर्म 'कृत्रिम'; मिळणार 22 स्थानिक भाषांचा सपोर्ट

एखाद्या व्यक्तीची कमाई जास्त, म्हणजे राहणीमान चांगलं आणि पर्यायाने आयुष्यही जास्त. तसंच, एखाद्या व्यक्तीला धूम्रपानाचं व्यसन असल्यास त्याचं आयुष्य कमी.. अशा प्रकारच्या तर्कानुसार हे टूल व्यक्तीचं आयुष्य किती असेल हे सांगू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.