AI Jobs : 'एआय'चा महिलांना बसणार अधिक फटका; कृत्रिम बुद्धिमत्ता हिरावून घेणार नोकऱ्या

सध्या पुरुषांच्या तुलनेत 80 टक्के महिला अशा क्षेत्रात आहेत, जेथे एआयचा वापर केला जातो.
AI Stealing Women's Jobs
AI Stealing Women's JobseSakal
Updated on

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चं वर्चस्व जगभरात वाढत आहे. एआयमुळे काही तासांमध्ये होणारं काम काही मिनिटांत किंवा काही सेकंदात होऊ लागलंय. मानवाला सुविधा देण्याबरोबरच नोकऱ्यांच्या क्षेत्रातही एआयचा दबदबा वाढू लागलय. एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र याचा मोठा फटका महिलांना बसणार आहे.

मॅकिस्ने ग्लोबल इन्स्टिट्यूटने हा दावा केला आहे. एआयमुळे नोकरी जाण्याचा धोका का आणि किती आहे हे जाणून घेण्यासाठी या संस्थेने एक रिसर्च केला होता. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की AI मुळे महिलांच्या सर्वाधिक नोकऱ्या जातील.

AI Stealing Women's Jobs
Google Genesis Tool : आता पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात; गुगलने आणलं बातम्या अन् आर्टिकल लिहिणारं एआय टूल

कसा पडणार प्रभाव?

महिलांना 1.5 पट अधिक नोकऱ्यांची गरज

कन्सल्टन्सी फर्म मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटने अमेरिकेतील कामगार बाजारपेठेतील नोकरीचा ट्रेंड समजून घेतला. संशोधन अहवालात म्हटलंय की, 2030 पर्यंत कामाच्या तासांपैकी एक तृतीयांश तास मशीनद्वारे पूर्ण केले जातील. महिलांना येत्या काही वर्षांत पुरुषांपेक्षा 1.5 पट जास्त नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. (AI Stealing Women's Jobs)

या क्षेत्रांमध्ये जोखीम जास्त

संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की कमी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक महिला आहेत. एआयमुळे या विभागातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. अहवालानुसार, ग्राहक सेवा, सेल्स ऑफिस आणि फूड सर्व्हिसेससह अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे जास्तीत जास्त महिला काम करतात. या क्षेत्रांमध्ये, मशीन आणि एआयचा जास्तीत जास्त वापर वाढेल.

AI Stealing Women's Jobs
LinkedIn AI Coach : आता लिंक्डइनवर नोकरी शोधणं अन् अप्लाय करणं होणार सोपं; एआय टूल करणार मदत

80 टक्के क्षेत्रात नुकसान

केनन-फ्लेग्लर बिझनेस स्कूलच्या मते, सध्या पुरुषांच्या तुलनेत 80 टक्के महिला अशा क्षेत्राशी संबंधित आहेत, जेथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो.

AI प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यात स्वारस्य

सध्या अधिकाधिक उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅट जीपीटी सारख्या सुसज्ज प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यात येतोय. वकील, शिक्षक, आर्थिक सल्लागार आणि वास्तुविशारदांसह व्हाईट कॉलर जॉबशी संबंधित लोकांना या बदलासाठी तयार राहावे लागेल. मॅकिन्सेच्या अहवालात म्हटलंय की, या क्षेत्रांशी संबंधित नोकऱ्या जातील.

इतर संस्थांचा सारखाच दावा

दुसर्‍या संशोधन अहवालात, गोल्डमन सॅक्सने म्हंटलय की असे 15 व्यवसाय आहेत जे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वाईटरित्या प्रभावित होऊ शकतात. यामध्ये व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि कायदेशीर नोकऱ्यांचा समावेश आहे. रेव्हेलिओ लॅबच्या अहवालात म्हटलंय की, एआयमुळे दुभाषी, प्रोग्रामर आणि टेलिमार्केटर यांच्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. 71 टक्के स्त्रिया अशा क्षेत्रात आहेत जिथे AI चा वापर वाढलाय.

AI Stealing Women's Jobs
AI Safeguards : 'एआय'चा धोका कमी करण्यासाठी प्रमुख टेक कंपन्यांचा पुढाकार; व्हाईट हाऊससोबत केला करार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.