CSMT Air Handling : ‘सीएसएमटी’ सबवेमध्ये ‘एअर हँडलिंग सिस्टीम’ ; पादचाऱ्यांची घुसमट आता थांबणार

CSMT Subway : भुयारी मार्गावर स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती
air handling system csmt subway
air handling system csmt subwayesakal
Updated on

Mumbai : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गात (सबवे) डागडुगीचे काम प्रगतिपथावर आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात काही सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यामध्ये अलार्मसह भुयारी मार्गामध्ये ‘एअर हँडलिंग सिस्टीम’ बसवण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे पर्याप्त ऑक्सिजनची व्यवस्था केली जात असून यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची घुसमट थांबणार आहे.

सीएसएमटी सबवे हा मुंबईतील मोठ्या रहदारीचा भुयारी मार्ग आहे. दिवसभरात लाखो पादचारी येथून प्रवास करतात. या भुयारी मार्गाची डागडुगी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. डागडुगी करताना अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. यामध्ये भुयारी मार्गात आग लागताच येथे फायर अलार्म बसविण्यात आला आहे.

air handling system csmt subway
Sugarcane Production : ‘एआय’द्वारे ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग ठरला यशस्वी; 'या' हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ,जाणून घ्या

या सबवेमधून बाहेर पडण्यासाठी सहा मार्ग देण्यात आले आहे. त्यातच या मार्गात हवा खेळती राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे पादचाऱ्यांना घुसमट सहन करावी लागते. हे लक्षात घेत या ठिकाणी ‘एअर हँडलिंग सिस्टीम’ बसवण्यात येत आहे.

air handling system csmt subway
Proba-3 Mission : सूर्याला लागणार आर्टिफिशियल ग्रहण; इस्रो प्लॅन करतंय मोहीम, या दोन उपग्रहांचं होणार लाँचिंग,जाणून घ्या

स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सीएसएमटी भुयारी मार्गाच्या डागडुजीच्या कामात नवीन टाईल्स, विद्युत दिवे, साईन बोर्ड, रंगरंगोटीचा समावेश आहे. या कामानंतर या ठिकाणी स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. भुयारी मार्गाच्या साफसफाईसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी पालिकेच्या ‘ए’ विभागाने ई - निविदा प्रक्रिया ही सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून पुढील वर्षभरासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.