Airtel 5G Plus vs Jio True 5G: कोणती कंपनी देतेय टॉप 5G स्पीड? येथे पाहा शहरांची यादी

airtel 5g plus vs jio true 5g whos network 5g speed is better in india check details
airtel 5g plus vs jio true 5g whos network 5g speed is better in india check details
Updated on

Airtel 5G Plus vs Jio True 5G: भारतीय दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने 24 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या मुहूर्तावर 5G रोलआउट सुरू करण्याची घोषणा केली होती, परंतु ती सेवा आधीच सुरू झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये Jio 5G वेलकम ऑफरसह 5G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, सर्व वापरकर्त्यांना त्वरित लाभ मिळणार नाही आणि कंपनी निवडक ग्राहकांसाठी 5G चाचणी करत आहे. त्याच वेळी, एअरटेल आधीच आठ शहरांमध्ये आपली Airtel 5G Plus सेवा देत आहे.

Jio 5G वेलकम ऑफर अंतर्गत, निवडक वापरकर्त्यांना 1GB हाय-स्पीड डेटा मोफत दिला जात आहे. चाचणी दरम्यान, विविध शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या 5G स्पीडशी संबंधित माहिती समोर आली आहे. Ookla Speedtest Intelligence च्या रिपोर्टनुसार, भारतात विद्यमान 5G सेवांसह 809.94Mbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड उपलब्ध आहे. डेटा नुसार ऑपरेटर अजूनही नेटवर्क रिकॅलिब्रेट करत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अधिक चांगला स्पीड मिळू शकतो.

airtel 5g plus vs jio true 5g whos network 5g speed is better in india check details
Ola Electric Scooter: अरे वा! लवकरच ओला घेऊन येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, काय असेल खास?

5G स्पीडशी संबंधित डेटा समोर

Ookla ने Airtel आणि Reliance Jio च्या 5G स्पीडची तुलना चार शहरांमध्ये केली आहे जिथे या दोघांच्या वापरकर्त्यांना 5G सेवा मिळू लागल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथे Reliance Jio आणि Bharti Airtel मधील 5G ​​स्पीड कोणाला चांगला मिळतो ते पाहूया.

  • दिल्ली: एअरटेलला राष्ट्रीय राजधानीत दिल्लीमध्ये सुमारे 200Mbps (197.98Mbps) ची सरासरी डाउनलोड स्पीड मिळत आहे. त्या तुलनेत, रिलायन्स जिओला दिल्लीत जवळपास 600Mbps (598.58Mbps) 5G स्पीड मिळाला आहे.

  • कोलकता: एअरटेलला त्याच्या 5G नेटवर्कसाठी कोलकाता येथे 33.83Mbps ची सरासरी डाउनलोड स्पीड मिळत आहे. त्याच वेळी, जिओला कोलकाता येथे 482.02Mbps ची सरासरी डाउनलोड स्पीड मिळाली आहे.

  • मुंबई: एअरटेलला मुंबईत 271.07Mbps चा 5G मीडियन डाउनलोड स्पीड मिळाला. त्याच वेळी, जिओला मुंबईत 515.38Mbps ची मध्यम डाउनलोड स्पीड मिळेल असे सांगण्यात आले आहे.

  • वाराणसी: एअरटेलला त्याच्या 5G नेटवर्कवर वाराणसीमध्ये 516.57Mbps ची सरासरी डाउनलोड स्पीड मिळाली आहे. त्याच वेळी, येथे रिलायन्स जिओला त्याच्या नेटवर्कसह 485.22Mbps ची मध्यम डाउनलोड स्पीड मिळाली आहे.

airtel 5g plus vs jio true 5g whos network 5g speed is better in india check details
Redmi A1 Plus: रेडमीचा स्वस्तात मस्त फोन येतोय, किती असेल किंमत जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.