Airtel Free Recharge : एअरटेल ग्राहकांना मोठा दिलासा; कंपनीने सुरू केली फ्री रिचार्जची सुविधा,नेमकं कारण काय? बघाच

Airtel Provides Free Data and Extended Bill Payment for Flood-Hit North East : एअरटेलने ईशान्य भारतातील आपल्या ग्राहकांसाठी खास मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रीपेड ग्राहकांना पुढील काही दिवसांसाठी दररोज 1.5GB मोफत डाटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे.
Airtel's Relief Package Free 1.5GB Data, Calls for North East Amid Floods
Airtel's Relief Package Free 1.5GB Data, Calls for North East Amid Floodsesakal
Updated on

Airtel Latest Update : देशातील दूरसंचार सेवा प्रदाता असलेली एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा मदतीस पुढे सरसावली आहे. ईशान्य भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे मणीपूर, मिझोरम आणि मेघालय या राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या संकटात्मक परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी airtel पुढे आलं आहे.

या राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोबाईल नेटवर्क व्यवस्थित काम करत नसल्यामुळे एअरटेलने ईशान्य भारतातील आपल्या ग्राहकांसाठी खास मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रीपेड ग्राहकांना पुढील काही दिवसांसाठी दररोज 1.5GB मोफत डाटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर पोस्टपेड ग्राहकांनाही बिल भरण्याची मुदत वाढवून मोठा दिलासा दिला आहे.

पूर्वे भारतातील प्रीपेड ग्राहकांसाठी मोफत डाटा आणि कॉलची सुविधा

पूर्वेकडील भारतात अतिवृष्टीमुळे नेटवर्क व्यवस्थित काम न करत असल्याने लोकांचे मोबाईल नेटवर्कवर अवलंबून असलेले व्यवहार आणि संवाद अडचणीत आले आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये एअरटेलने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा खास ऑफर दिला आहे. या अंतर्गत प्रीपेड ग्राहकांना दररोज 1.5GB मोफत डाटा आणि 4 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. यामुळे या भागातील लोकांना मदत होणार असून त्यांचे संपर्क आणि आवश्यक माहिती मिळविण्याची सोय सुलभ होणार आहे.

Airtel's Relief Package Free 1.5GB Data, Calls for North East Amid Floods
BSNL Mega Recharge : BSNLचा बंपर रिचार्ज प्लॅन पाहिला काय? 100 रुपयांच्या खर्चात 1 वर्षाचा पॅक; कॉलिंग,डेटा अन् वेगवेगळ्या सुविधा

पोस्टपेड ग्राहकांना बिल भरण्याची मुदतवाढ

एअरटेलने नेहमीच आपल्या ग्राहकांच्या अडचणींना समजून घेतले आहे. याच हेतून कंपनीने पूर्वेकडील भारतातील आपल्या पोस्टपेड ग्राहकांनाही मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने बिल भरण्याची मुदत आणखी 30 दिवसांनी वाढवली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार असून त्यांचे संपर्क नेटवर्क चालू ठेवता येणार आहे.

Airtel's Relief Package Free 1.5GB Data, Calls for North East Amid Floods
Jio Recharge Plans : जिओ धमाका ऑफर! 200 रुपयांपेक्षा कमीत 12 OTT प्लॅटफॉर्म,मिळणार डेटा अन् महिन्याभराची वैधता

त्रिपुरा मध्ये इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) ची सुरुवात

या ऑफर्स व्यतिरिक्त, एअरटेलने त्रिपुरा मध्ये इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) नावाची नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे एअरटेल नेटवर्क सिग्नल कमजोर असलेल्या ठिकाणी एअरटेल ग्राहक दुसऱ्या नेटवर्कवरून कॉल करू शकणार आहेत. याचबरोबर इतर दूरसंचार कंपन्यांचे ग्राहकही या व्यवस्थे अंतर्गत एअरटेलच्या नेटवर्कवर कॉल करू शकणार आहेत. या उपक्रमामुळे या भागातील सर्व वापरकर्त्यांसाठी नेटवर्कची विश्वसनीयता वाढणार असून सतत संपर्क राखता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.