Airtel Data Leak : एअरटेलने दुसऱ्यांदा विकला ३७ कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा? हॅकरकडून डेटा लिकच्या पुराव्यांवर कंपनी म्हणाली...

Airtel Hacked : एका हॅकरने लोकप्रिय हॅकिंग फोरमवर 37.5 कोटी भारतीय ग्राहकांचा डाटा विक्रीसाठी ठेवला असल्याची बातमी समोर आली होती. यापूर्वी २०२१ मध्ये देखील कंपनीवर झालेत डेटा लिकचे आरोप.
Airtel Data Breach
Airtel Data Breachesakal
Updated on

Airtel : एअरटेलने त्यांच्या रीचार्ज प्लॅन्सच्या दरात वाढ केल्याने ग्राहक नाराज आहेत. अश्यात काही दिवसांपासून एअरटेल वापरकर्त्यांचा पर्सनल डेटा लिक झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अश्यात या चर्चाच खंडन करत भारती एअरटेलने त्यांच्या 37.5 कोटी ग्राहकांच्या डाटा लीकेजची बातमी फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. या आरोपांनंतर एअरटेलच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे की, "आम्ही संपूर्ण तपासणी केली आहे आणि आमच्या सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा लीकेज झालेला नाही किंवा कंपनीने कोणताही डेटा विक्रीसाठी ठेवला नाहीये" असे त्यांनी म्हटले आहे.

एका हॅकरने लोकप्रिय हॅकिंग फोरमवर 37.5 कोटी भारतीय ग्राहकांचा डाटा विक्रीसाठी ठेवला असल्याची बातमी समोर आली होती. 'xenZen' या नावाने ओळखला जाणारा हा हॅकर दावा करतो की, त्याच्याकडे ग्राहकांची मोबाईल नंबर, जन्म तारीख, वडिलांचे नाव, आधार क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी माहिती आहे. त्याने हा डाटाबेस 50,000 अमेरिकन डॉलर (₹41 लाख) मध्ये विकण्याची माहिती दिली होती.

हॅकरने हा डाटा लीकेज जून 2024 मध्ये झाला असल्याचा दावा केला आहे आणि काही डाटा नमुना देखील शेअर केले आहे. याशिवाय, xenZen आणखी एका लीकेजमध्ये सहभागी असल्याचा दावा करतो. त्यानुसार, त्याच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पासपोर्ट धारकांच्या डाटाबेसचा डाटा आहे.

Airtel Data Breach
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

एअरटेलने यापूर्वी देखील त्यांच्या ग्राहकांच्या डाटा लीकेजची बातमी फेटाळली होती. 2021 मध्ये, सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील संशोधक राजशेखर राजारिया यांनी 2.5 दशलक्षाहून अधिक एअरटेल ग्राहकांचा डाटा 'रेड रॅबिट टीम' नावाच्या धोकादायक संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केल्याचे उघड केले होते. पण तीन महिन्यानंतर तो डाटा काढून टाकण्यात आला होता. तरीही, एअरटेलने त्यावेळीही कोणत्याही प्रकारचा डाटा लीकेज झालेला नाही असे स्पष्ट केले होते.

Airtel Data Breach
Call History : क्षणात मिळवा कुणाचीही कॉल हिस्ट्री! जिओ अन् एअरटेलने आणलं नवीन फिचर,कसं वापरायचं जाणून घ्या

जिओ आणि वोडाफोन आयडिया या इतर प्रमुख भारतीय दूरसंचार कंपन्यांच्या ग्राहकांच्या डाटाबेसमध्ये देखील अशाप्रकारे लीकेज झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या लीकेजमुळे त्यांना आर्थिक फसवणूक, ओळख चोरी आणि असुरक्षित फोन कॉल्स यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.