airtel, jio and vi 2gb daily data prepaid plans : एअरटेल, जिओ आणि व्ही(Vi) त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक नवीन प्रीपेड प्लॅन दिले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला डेटा, व्हॅलिडिटी, स्ट्रीमिंग सर्व्हिस, अमर्यादित कॉल आणि एसएमएस बेनिफिट्स देण्यात येतात. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार या पैकी प्लॅनची निवड करतात. प्लॅन निवडताना थोडी काळजी घेतली तर ग्राहकांचे पैसेही वाचू शकतात. यासाठी बेस्ट मार्ग म्हणजे वार्षिक प्रीपेड प्लॅन निवडणे. यासाठी जास्त किंमत द्यावी लागत असली तरी, या प्लॅनमुळे पुन्हा-पुन्हा रिचार्जचा ताण दूर होतो सोबत कमी पैशात अधिक डेटा बेनिफिट्स देखील मिळतात.
आज आपण Airtel, Jio आणि Vi च्या 2GB डेली डेटा प्रीपेड प्लॅनबद्दल तसेच सारखेच बेनिफिट्स देणार्या वार्षिक प्लॅन्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत...
एअरटेल: 2GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन Vs वार्षिक प्लॅन
Airtel कडून असेच 2GB डेली डेटासह भरपूर प्रीपेड प्लॅन ऑफर केले जातात, वेगवेगळ्या किमतीत अनेक प्लॅन सध्या उपलब्ध आहेत. या यादीमध्ये 179 रुपये (28 दिवसांची वैधता), 359 रुपये (28 दिवसांची वैधता), 549 रुपये (56 दिवसांची वैधता), 838 रुपये (56 दिवसांची वैधता), 839 रुपये (84 दिवसांची वैधता) तर 1799 रुपये (365 दिवसांची वैधता) यांचा समावेश आहे.
2999 रुपये (365 दिवसांची वैधता) आणि 3359 रुपये (365 दिवसांची वैधता) असलेल्या प्लॅन्सचा समावेश आहे. या सर्व प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलचे बेनिफिट्स मिळतात. फरक फक्त स्ट्रीमिंग बेनिफिट्स आणि वैधता यामध्ये येतो. यापैकी बहुतेक 30-दिवसांच्या Amazon प्राइम व्हिडिओ बेनिफिट्ससह येतात आणि काही Airtel च्या Xstream मोबाइल पॅक व्यतिरिक्त इतर Airtel Thanks अॅप बेनिफिट्स देतात.
एअरटेलचे प्रीपेड प्लॅन 838 रुपये आणि 3359 रुपये यामध्ये Disney+ Hotstar चे एक वर्षाचे सब्सस्क्रिप्सन देतात. दैनंदिन डेटा बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास, हे स्पष्ट आहे की प्लानची किंमत जसजशी वाढते तसतसे बेनिफिट्स वाढतात. ग्राहकाचे दररोजच्या डेटा बेनिफिट्ससाठीचा कमी खर्च होईल आणि तुमचे पैसे देखील वाचतील.
उदाहरणार्थ, 12 महिन्यांसाठी 359 रुपये भरणारा ग्राहक 12 महिन्यांसाठी एकूण 4308 रुपये खर्च करेल. त्याऐवजी, वापरकर्त्याने थेट 2999 रुपयांचा वार्षिक प्लॅन घेतल्यास , 1309 रुपयांची बचत होईल.जरी ग्राहकाने 3359 रुपयांच्या वार्षिक प्लॅनची निवड केली तरीही, सुमारे 949 रुपयांची बचत होऊ शकते. याशिवाय, डिस्ने+ हॉटस्टारच्या एका वर्षाच्या मोबाइल सबस्क्रिप्शनसह हा प्लॅन मिळत आहे.
Jio: 2GB 2GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन Vs वार्षिक प्लॅन
Jio 2GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन 249 रुपयांपासून सुरू होतात. जिओचा सर्वात महागडा वार्षिक प्लॅन 3119 रुपयांचा आहे. Jio 2GB दैनंदिन डेटा प्लॅनच्या यादीमध्ये रुपये 249 (23 दिवसांची वैधता), रुपये 299 (28 दिवसांची वैधता), रुपये 499 (28 दिवसांची वैधता), रुपये 533 (56 दिवसांची वैधता), रुपये 719 (84 दिवस वैधता) मिळते, तर 799 रुपये (56 दिवसांची वैधता), 1066 रुपये (84 दिवसांची वैधता) आणि 2879 रुपये (365 दिवसांची वैधता), 3119 रुपये (365 दिवसांची वैधता) देणारे प्लॅन ऑफर केले आहेत.
सर्व प्लॅन जिओचे स्वतःचे स्ट्रीमिंग अॅप, अमर्यादित कॉल्स आणि 100 एसएमएस दररोज यासोबत येतात. चार प्लॅन 499 रुपये , 799 रुपये , 1066 रुपये आणि 3119 रुपये वर– Disney+ Hotstar चे एक वर्षाचे मोफत मोबाईल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
Vi: 2GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन
Vi च्या 2GB ली डेटा प्रीपेड प्लॅनच्या यादीमध्ये 179 रुपये (28 दिवसांची वैधता), 359 रुपये (28 दिवसांची वैधता), 539 रुपये (56 दिवसांची वैधता) आणि 839 रुपये (84 दिवसांची वैधता)प्लॅनचा समावेश आहे. Vi कडे 2GB डेली डेटासह वार्षिक प्लॅन नाही. मात्र 3099 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. इतर दोन वार्षिक प्लॅन 1799 रुपये (एकूण 24GB डेटा) आणि 2899 रुपये (1.5GB डेली डेटा) सह येतात. Vi आपली स्ट्रीमिंग सेवा Vi Movies & TV यापैकी बहुतेक प्लॅनसह, दररोज 100 SMS आणि मोफत कॉल्ससह ऑफर करते.
तसेच दररोज 2GB किंवा दररोज 1.5GB डेटा सह डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन फक्त 3099 रुपयांच्या प्लॅनसह एका वर्षासाठी मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.