नवीन मोबाईल कनेक्शन घ्यायचे असेल तर कोणत्या कंपनीचे कनेक्शन योग्य असेल याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो.
नवीन मोबाईल कनेक्शन (Mobile Connection) घ्यायचे असेल तर कोणत्या कंपनीचे कनेक्शन योग्य असेल याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. कोणत्या कंपनीचे ग्राहक या सेवेवर खूश आहेत आणि कोणत्या कंपनीचे ग्राहक सर्वाधिक नाराज आहेत, याचा कानोसा घेऊन ग्राहक मोबाईल सिम (Mobile Sim) घेत असतो. मात्र भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नुकताच याबाबत एक मोठा खुलासा केला आहे, जे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. (Airtel, Jio and Vi lagged behind in terms of service delivery)
सर्वाधिक तक्रारी या मोठ्या कंपनीच्या सेवेशी
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ट्रायला एअरटेलच्या (Airtel) विरोधात सेवेशी संबंधित सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यानंतर व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) आणि रिलायन्स जिओचा (Reliance Jio) क्रमांक लागतो. ही माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली. दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान (Devusingh Chouhan) यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला 2021 मध्ये भारती एअरटेल विरुद्ध 16,111 सेवा संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर Vodafone Idea 14,487 आणि Reliance Jio बाबत 7,341 तक्रारी आल्या आहेत. Vodafone Idea विरुद्ध 14,487 तक्रारींपैकी 9,186 Idea विरुद्ध आणि 5,301 Vodafone विरुद्ध होत्या. डेटा दर्शवितो की TRAI ला MTNL विरुद्ध 732 आणि BSNL विरुद्ध 2,913 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
दळणवळण राज्यमंत्री चौहान म्हणाले, की TRAI कायदा, 1997 मध्ये TRAI द्वारे वैयक्तिक ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्याची कल्पना केली नाही. तथापि, ट्रायमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित सेवा प्रदात्यांकडे योग्य कारवाई करण्यासाठी पाठवल्या जातात. ट्रायने सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना (TSPs) ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी द्विस्तरीय तक्रार / तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यास अनिवार्य करण्यात आले आहे.
तक्रार निवारण यंत्रणेच्या अंतर्गत, ग्राहक त्याच्या TSPs च्या तक्रार केंद्रावर सेवेशी संबंधित तक्रारी नोंदवू शकतो. चौहान म्हणाले की, तक्रार केंद्रावर सेवा प्रदात्याकडून तक्रारीचे समाधानकारक निराकरण न झाल्यास, TSPs च्या अपील प्राधिकरणाकडे अपील दाखल केले जाऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.