Airtel Recharge Plans : एअरटेल धमाका ऑफर! २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत २० पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्स,बंपर डेटा आणि बरंच काही

Airtel OTT Recharge : बीएसएनएलने स्वस्त दरामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचा रिचार्ज उपलब्ध करून दिल्यानंतर आता एअरटेलने देखील त्यांचे OTT रिचार्ज प्लॅन्स लॉंच केले आहेत.
airtel Offers Free OTT Subscriptions with Select Recharge Plans
airtel Offers Free OTT Subscriptions with Select Recharge Plansesakal
Updated on

Airtel Offer Recharge : बीएसएनएलने स्वस्त दरामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचा रिचार्ज उपलब्ध करून दिल्यानंतर आता एअरटेलच्या एकाच रिचार्जमध्ये मनोरंजनाचा खचाखच भरलेला खजिना मिळणार आहे. एअरटेलने तीन खास रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्सची फ्री सब्सक्रिप्शन मिळते. मजेशीर बाब म्हणजे तुमच्या बजेटनुसार तुम्ही यातील कोणताही प्लॅन निवडू शकता.

181 रुपयांचा प्लॅन - डेटा आणि मनोरंजन

फक्त 181 रुपयांमध्ये मिळणारा हा प्लॅन खास तुमच्यासाठी आहे, ज्यांना फक्त जास्तीत जास्त डेटा हवा आहे. या डेटा वाउचरमध्ये तुम्हाला 15GB डाटा मिळतोच, त्यासोबतच एअरटेल Xstream Play ची फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. सोनीलिव्ह, इरोस नाऊ, चौपाल, होइचोई आणि लायन्सगेट प्लेसारख्या अनेक लोकप्रिय OTT अॅप्सचा आनंद घ्या, तेही अगदी फ्री.

airtel Offers Free OTT Subscriptions with Select Recharge Plans
BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये BSNL ला रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वीच असं चेक करा नेटवर्क स्टेटस

पैसा वसूल 449 रुपयांचा प्लॅन

449 रुपये इतक्या कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 3GB डाटा आणि 100 मोफत SMS मिळतात. पण या प्लानमधील खरी खासियत म्हणजे एअरटेल Xstream Play ची फ्री सब्सक्रिप्शन. आता अतिरिक्त शुल्क न देता तासन्तास मनोरंजन करा.

airtel Offers Free OTT Subscriptions with Select Recharge Plans
BSNL Rechage Plan : BSNL धमाका ऑफर! फक्त 91 रुपयांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांची वैधता, कॉलिंग अन् डेटासह इतर भन्नाट सुविधा

838 रुपयांचा प्लॅन

तुम्हाला जर दीर्घकाळासाठी रिचार्ज करायचे असेल तर 838 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. 56 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डाटा, 100 SMS आणि एअरटेल Xstream Play ची फ्री सब्सक्रिप्शन मिळते. यासोबतच तुम्हाला Amazon Prime Video ची फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका एअरटेलच्या मजबूत नेटवर्कसोबत तुम्हाला मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.