Airtel: थेट घरपोच मिळेल Airtel चे 5G सिम, एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही; पाहा प्रोसेस

शातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ने काही दिवसांपूर्वीच देशात ५जी सर्व्हिस सुरू केली आहे. आता कंपनी ग्राहकांना मोफत नवीन सिम कार्ड देत आहे.
Airtel
AirtelSakal
Updated on

Airtel 5G SIM Free: देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ने काही दिवसांपूर्वीच देशात ५जी सर्व्हिस सुरू केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये कंपनीने ५जी सेवा सुरू केली असून, हाय-स्पीड इंटरनेटसाठी नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही. यूजर्स जुन्याच सिम कार्डवर हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा घेऊ शकतात.

मात्र, तुमचे जुने सिम कार्ड खराब झाले असेल अथवा नवीन सिम कार्ड घ्यायचे असल्यास Airtel ग्राहकांना खास सुविधा देत आहे. यूजर्सला घरबसल्या नवीन ५जी सिम कार्ड मिळेल. या प्रोसेसविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Airtel
First iPhone: 'प्रोजेक्ट पर्पल'... कर्मचाऱ्यांना कैद केल्यावर पहिला आयफोन अस्तित्वात आला!

कसे ऑर्डर कराल Airtel 5G SIM

तुम्ही सहज घबसल्या नवीन Airtel 5G SIM कार्ड मागवू शकता. यासाठी तुम्हाला Airtel च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नवीन मोबाइल नंबरसाठी विनंती करा. तुम्ही नवीन सिम कार्ड पर्यायावर क्लिक केल्यास एक फॉर्म ओपन होईल. येथे तुम्हाला Switch To Airtel, Airtel Prepaid To Postpaid सारखे पर्याय दिसतील.

तुम्ही इतर नेटवर्कमधून एअरटेलवर स्विच व्हायचे असल्यास Switch To Airtel या पर्यायावर क्लिक करा. तसेच, प्रीपेड मधून पोस्टपेड कनेक्शनमध्ये स्विच व्हायचे असल्यास Airtel Prepaid To Postpaid वर क्लिक करा. तुम्हाला नवीन सिम कार्डसाठी मोबाइल नंबर, पत्ता, शहर इत्यादी माहिती द्यावी लागेल. ज्या पत्त्यावर सिम कार्ड हवे आहे, तेथील माहिती द्या.

हेही वाचा: Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! ८ जीबी रॅमसह येणारा फोन मिळतोय खूपच स्वस्त, जाणून घ्या ऑफर

Submit वर क्लिक केल्यानंतर Airtel कडून फोन येईल. येथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरी सिम कार्ड डिलिव्हर होईल. अशाप्रकारे तुम्हाला मोफत Airtel चे सिम कार्ड मिळेल व तुम्ही ५जी सर्व्हिसचा फायदा घेऊ शकता.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()