Airtel Recharge : रिचार्ज प्लॅन महागले! जिओनंतर आता एअरटेल ग्राहकांच्या खिश्याला कात्री; 'या' तारखेपासून लागू होणार नवे दर

Recharge Upadate : एअरटेल वापरकर्त्यांच्या खिश्याला आता लवकरच कात्री लागणार आहे.
Airtel Recharge Plan Price Increased
Airtel Recharge Plan Price Increasedesakal

Airtel : एअरटेल वापरकर्त्यांच्या खिश्याला आता लवकरच कात्री लागणार आहे. मोबाईल नेटवर्क ऑपरेटर एअरटेलने 3 जुलैपासून त्यांच्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल रिचार्जच्या दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, "मोबाइल व्यवसायाची आर्थिक स्थिती मजबूत राखण्यासाठी आणि नेटवर्कच्या उन्नतीसाठी दर वाढ करणे आवश्यक आहे."

ग्राहकांवर कमी आर्थिक भार पडावी म्हणून एअर्टेलने खासगी आश्वासन दिले आहे की, किमान दरांच्या योजनांमध्ये दरवाढ अगदी कमी (70 पैशाहूनही कमी) असेल.उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स जिओने देखील त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या दरांमध्ये वाढ केली आहे. ही दरवाढही 3 जुलैपासून लागू होईल.

Airtel Recharge Plan Price Increased
Clean Gmail Storage : Gmailचं स्टोरेज झालंय फुल? मिनिटात होईल रिकामं,वापरून पाहा 'या' स्मार्ट ट्रिक्स

एअर्टेलच्या नवीन दरांमध्ये थोडी कमी वाढ करण्यात आली आहे. जुन्या दरांच्या तुलने नवीन दरांची माहिती पुढीलप्रमाणे आहे -

₹199 ची योजना: आधी ₹179 मध्ये मिळणारी ही योजना आता ₹199 मध्ये उपलब्ध होईल. यामध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील.

₹509 ची योजना: आधी ₹455 मध्ये मिळणारी ही योजना आता ₹509 मध्ये उपलब्ध होईल. यामध्ये 84 दिवसांसाठी 6GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील.

₹1999 ची योजना: आधी ₹1799 मध्ये मिळणारी ही योजना आता ₹1999 मध्ये उपलब्ध होईल. यामध्ये 365 दिवसांसाठी 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील.

अशाच प्रकारे इतरही अनेक प्रीपेड आणि पोस्टपेडच्या योजनांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Airtel Recharge Plan Price Increased
AI Threat : एआयच निघाला सायबर चोर! तुमच्या मोबाईल अन् लॅपटॉपमधला डेटा आहे धोक्यात, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

या नवीन दरांमध्ये डेटा अॅड-ऑन आणि पोस्टपेड कार्डच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. सर्व रिचार्जवर ही नवीन दरवाढ 3 जुलै 2024 पासून लागू होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या नवीन दरांची संपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

आता जिओ नंतर एअरटेल कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहक वर्ग मात्र निराश झाला आहे. 3 जुलैच्या दरवाढीचा भविष्यात के परिणाम होईल हे बघण्यासारखे असेल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com