Best Recharge Plans: टेलिकॉम कंपन्या Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea कडे १५ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स उपलब्ध आहेत. यूजर्सच्या गरजेनुसार कंपन्या प्लॅन्स ऑफर करतात. या कंपन्यांकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Reliance Jio
टेलिकॉम कंपनी रिलायन्सकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा २०९ रुपयांचा प्लॅन आहे. तर १७९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २४ दिवस आणि १४९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २० दिवस आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस, दररोज १ जीबी डेटा आणि Jio Apps चा अॅक्सेस मिळेल.
दररोज १.५ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या प्लॅन्सची किंमत ११९ रुपये, १९९ रुपये, २३९ रुपये आणि २५९ रुपये आहे. या रिचार्ज प्लॅन्सची वैधता १४ दिवस, २३ दिवस, २८ दिवस आणि संपूर्ण एक दिवस आहे. कंपनीकडे दररोज २ जीबी डेटासह येणारा २४९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध असून, याची वैधता २८ दिवस आहे. तर ३० दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या २९६ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळेल. प्लॅन्समधील इतर बेनिफिट्स समानच आहेत.
एअरटेल
एअरटेलच्या दररोज १ जीबी डेटासह येणाऱ्या प्लॅन्सची किंमत २०९ रुपये, २३९ रुपये, २६५ रुपये आहे. या प्लॅन्सची वैधता अनुक्रमे २१ दिवस, २४ दिवस आणि २८ दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एसएमएसची देखील सुविधा मिळेल.
दररोज १.५ जीबी डेटासह येणाऱ्या प्लॅनची किंमत २९९ रुपये असून, याची वैधता २८ दिवस आहे. तसेच, २९६ रुपयांच्या प्लॅनच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी एकूण २५ जीबी डेटा मिळेल. या प्लॅन्समध्ये देखील तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.
वोडाफोन आयडिया
वोडाफोन आयडियाकडे २९९ रुपयांचा शानदार प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. तर दररोज २ जीबी डेटासह येणाऱ्या २८ दिवसांच्या प्लॅनची किंमत ३१९ रुपये आहे. वीआयकडे दररोज १ जीबी डेटासह येणारे इतरही प्लॅन्स उपलब्ध आहेत. प्लॅन्सची किंमत २६९ रुपये, २३९ रुपये, १९९ रुपये आणि २१९ रुपये आहे. या प्लॅन्सची वैधता अनुक्रमे २८ दिवस, २४ दिवस, १८ दिवस आणि २१ दिवस आहे. या सर्व प्लॅन्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज मोफत एसएमएस देखील मिळतील.
हेही वाचा: Upcoming Phone: Samsung करणार धमाका! आणणार ८ हजारांच्या बजेटमधील स्मार्टफोन; फीचर्स लीक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.