Akshaya Tritiya 2023 : या अक्षय तृतीयेला गोल्ड ते डायमंड, इथे मिळणार 50% सूट, वाचा भन्नाट ऑफर

चला तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कुठली कुठली ज्वेलरी खरेदी करू शकता ते जाणून घेऊया
Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023esakal
Updated on

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेच लोक सोनं खरेदी करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं किंवा सोन्यात गुंतवणुक करणे फार शुभ मानले जाते. त्यामुळे यावेळी बरेच ज्वेलर सोन्याच्या खरेदीवर भारी डिस्काउंटही देताय. आज आम्ही तुम्हाला गोल्ड ते डायमंड असे सगळे ऑप्शन्स तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कुठली कुठली ज्वेलरी खरेदी करू शकता ते जाणून घेऊया.

सोन्याच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत. अशावेळी काही ज्वेलर्स मात्र सोन्यावर तुम्हाला तब्बल ५० टक्क्यांपर्यंत सूट देताय. त्यामुळे सर्वसामान्यांना पैशांचा दरात दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊया या ऑफरबाबत.

मेकिंग चार्जवर ५० टक्क्यांपर्यंत सूट

अक्षय तृतीयेनिमित्य काही ज्वेलर्स त्यांच्या ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर ५० टक्के सूट देताय. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आउलटेटमधे जावे लागेल आणि ऑफरबाबत सविस्तर विचारावे लागेल. ऑफरची व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही सोने विकत घेऊ शकता.

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 : शीतलता प्रदान करणारा ‘वाळा', अक्षय्य तृतीयेला धार्मिकतेबरोबरच आरोग्यविषयक महत्व

तनिष्क ज्वेलर्स देतेय बंपर ऑफर

तनिष्क ज्वेलर्सने त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलवर त्यांच्या या खास ऑफरबाबत माहिती दिलीय. २२ एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी तनिष्क मेकिंग चार्ज ते गोल्ड, डायमंड आणि चांदीच्या ज्वेलरी खरेदीवर मोठी सूट देणार आहे.

जुन्या ज्वेलरीच्या बदली तुम्ही घेऊ शकता नवी ज्वेलरी

सेंको गोल्ड त्यांच्या मेकिंग चार्जवर ५० टक्क्यांपर्यंत सूट देतेय. ही ऑफर गोल्ड आणि डायमंड दोन्ही ज्वेलरीवर आहे. तसेच जुने दागिने एक्सचेंज करताना पैसे सुद्धा कापले जाणार नाही. (Akshaya Tritiya)

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळतेय सोन्याचे नाणे; जाणून घ्या

मालाबार गोल्डवर मिळतोय फ्री सोन्याचा शिक्का

मालाबार गोल्ड त्यांच्या ग्राहकांना गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीच्या खरेदीवर सोन्याचा शिक्का फ्री देताय. मात्र यासाठी तुम्हाला त्यांच्या दुकानातून कमीत कमी ३० हजारांच्या सोन्याची विक्री करावी लागेल. ज्यावर तुम्हाला १०० मिलीग्राम सोन्याचा शिक्का फ्री दिल्या जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.