Researcher Study: मद्यपान करताच लोक इंग्रजी कशी काय बोलू लागतात ?

अल्कोहोलमधे असं कायं असंत ज्यामुळे मद्यपान करणारी माणसं इंग्रजी बोलू लागतात ? रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी याविषयाचा खुलासा केलाय.
Researcher Study
Researcher Studyesakal
Updated on

Scientific Facts Of Alcohol: मद्यपान करणारी बरीच लोकं तु्म्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात बघितली असतील. पण तुम्ही कधी बारीकपणे लक्ष दिल्यास मद्यपान करणारी लोकं जास्तीत जास्त इंग्रजी बोलतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की असं का होतं ? अल्कोहोलमधे असं कायं असंत ज्यामुळे मद्यपान करणारी माणसं इंग्रजी बोलू लागतात ? रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी याविषयाचा खुलासा केलाय. (alcohol builds confidence to speak in english researcher says)

रिसर्चमध्ये मोठा खुलासा

मद्यपान करणाऱ्यांवर रिसर्चमधून एक मोठं सत्य पुढे आलंय. सायंस मॅक्झिन 'जर्नल ऑफ साइकोफॉर्मोलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार मद्यपान केल्यानंतर माणूस त्याच्या शुद्धीत नसतो त्यामुळे त्याचा कॉन्फिडंस वाढतो आणि दुसरी भाषा बोलण्यास त्याला मदत होते. या रिसर्चनुसार जर्मनमधील ५० लोकांचा समावेश केला गेला होता. या ५० लोकांनी डच भाषेचं ज्ञान घेतलं होतं. आणि ते नेदरलँदमध्ये शिकत होते. त्यांच्यामते मद्यपान केल्यानंतर त्याच्या वागणुकीत बदल होतो.

Researcher Study
Alcoholic Cardiomyopathy; अतिमद्यसेवनामुळे पुरुषांमध्ये वाढती समस्या

मद्यपान केल्याने वाढतो कॉन्फिडंस

मद्यपान केल्यानंतर माणुस त्याच्या शुद्धीत नसतो आणि त्यामुळे त्याचा कॉन्फिडंस वाढतो. त्यामुळे मनात कुठलीही भीती न बाळगता ही लोक इंग्रजी बोलू लागतात.

कसा लावला शोध ?

या विषयाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी (Scientist) एक मजेदार शक्कल लढवली. रिसर्चमध्ये काही लोकांना मद्य वाटप केल्या गेलं. तर काही लोकांना नॉर्मल ड्रिंक दिल्या गेलं. ज्यात अल्कोहोलचा समावेश नव्हता. त्यानंतर मद्य आणि नॉर्मल ड्रिंक घेणाऱ्या अशा दोन्ही गटातील लोकांना डच भाषेत बोलण्यास सांगितल्या गेले. ज्यांनी मद्यपान केले होते ते बिनदास्त डच भाषा बोलत होते तर ज्यांनी नॉर्मल ड्रिंक घेतली होती ते लोक डच बोलण्यास थोडे घाबरलेले दिसत होते. याचाच अर्थ मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये भाषेला घेऊन कॉन्फिडन्स जास्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.