ॲलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज

ॲलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज
Updated on

नवी दिल्ली : ॲमोझॉनचं ‘ॲलेक्सा’ आता घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. अनेकांच्या घरी याचा वापर होत असल्याचे दिसत आहे. अल्पावधीत हे चांगले प्रसिद्ध झाले आहे. आता तुम्हाला यात अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ॲमोझॉनचं ‘ॲलेक्सा’वर येणारे अमिताभ बच्चन हे पहिले भारतीय सेलिब्रिटी आहेत.

ॲमेझॉन व्हॉईस असिस्टंटच्या वापरकर्त्यांना वर्षभरासाठी १४९ रुपयांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. “Hey Alexa, introduce me to Amitabh Bachchan” (ॲलेक्सा, मला अमिताभ बच्चनशी ओळख करून द्या) असे म्हटल्यानंतर युजर्सना या सेवेचा लाभ घेता येईल.

ॲलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज
भाजप आमदाराच्या घोटाळ्यावर किरीट सोमय्या गप्प का?

या फिचरमध्ये युजर्सना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील विनोदी सीन, शायरी, प्रेरक कोट्स, त्यांच्या चित्रपटातील किस्से तसेच त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता ऐकायला मिळणार आहे. गुरुवारपासून हे फिचर सुरू करण्यात आले आहे. तसेच अलार्म सेट आणि बच्चन यांच्या शैलीमध्ये हवामानाचे अपडेट मिळवू शकतात, असे ॲमेझॉनने निवेदनात म्हटले आहे.

अमिताभ बच्चन पहिले भारतीय

ॲलेक्साला आवाज देणारे बच्चन हे पहिले भारतीय सेलिब्रिटी आहे. अमेरिकन अभिनेते सॅम्युएल एल जॅक्सन आणि मेलिसा मॅकार्थी आणि माजी बास्केटबॉल खेळाडू शकील ओनील यांनी आपला आवाज दिलेला आहे.

ॲलेक्सावर अमिताभ बच्चन यांचा आवाज
संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

ही अभिमानाची गोष्ट

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ध्वनी आणि ऑडिओसह माझ्याशी बोलण्यास आणि माझ्या आवाजात उत्तरे मिळवता येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाबूजींच्या कवितांचे वाचन माझ्या आवाजात होणार आहे, असे बच्चन यांनी शुक्रवारी पोस्ट केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.