Amazon Shopping Scam : ऑनलाईन शॉपिंगचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोक अगदी दररोजच्या वाण-सामान खरेदीसाठी देखील ऑनलाईन अॅप्सची मदत घेत आहेत. ऑनलाईन शॉपिंगवर ग्राहकांचा विश्वास बसलेला असतानाच, दुसरीकडे मात्र बऱ्याच वेळा ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटनाही समोर येत असतात. असाच एक प्रकार सध्या चर्चेत आहे.
एका ग्राहकाने अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवरुन 1 लाख रुपयांचा नवा लॅपटॉप खरेदी केला होता. मात्र, हा लॅपटॉप जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्या ग्राहकाच्या आनंदावर विरजण पडलं. कंपनीने त्याला नवीन लॅपटॉपऐवजी जुना वापरलेला लॅपटॉप पाठवला होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याने आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.
या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, की "अमेझॉनने माझी फसवणूक केली! मला आज अमेझॉनकडून 'नवा' लॅपटॉप मिळाला. मात्र हा आधीच कुणीतरी वापरलेला आहे. याची वॉरंटी देखील 2023 च्या डिसेंबर महिन्यातच सुरू झालेली आहे." या पोस्टमध्ये या व्यक्तीने अमेझॉन इंडिया आणि लिनोव्हो कंपनीला देखील टॅग केलं आहे.
या पोस्टवर अमेझॉन हेल्पने प्रतिक्रिया दिली आहे. ग्राहकाला आलेल्या या अनुभवाबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी एका लिंकवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे. मात्र इतर नेटिझन्स अमेझॉनवर अगदीच नाराज झालेले दिसतंय. या पोस्टच्या कमेंटमध्ये कित्येकांनी अमेझॉनला हा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचं म्हणत जाब विचारला आहे. तसंच लवकरात लवकर हा वापरलेला लॅपटॉप परत न्या आणि त्या व्यक्तीला नवीन लॅपटॉप द्या असंही कित्येक यूजर्सनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.