Amazon-Flipkart Sale : ऑनलाईन सेल्सची वाट पाहताय? कोणत्या बँकेच्या कार्डवर किती मिळतोय डिस्काउंट? जाणून घ्या

Bank Card Offers : 8 ते 15 ऑक्टोबर दरम्यान हे सेल असणार आहेत.
Amazon-Flipkart Sale
Amazon-Flipkart SaleeSakal
Updated on

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ई-कॉमर्स साईटवर मोठे सेल सुरू होणार आहेत. 8 ते 15 ऑक्टोबर दरम्यान हे सेल असणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, ब्युटी प्रॉडक्ट्स, टीव्ही, स्मार्टफोन, फॅशन अशा सर्व कॅटेगरीमध्ये बंपर डिस्काउंट मिळणार आहे.

या सेलमध्ये दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या बँक ऑफर्स मिळणार आहेत. यामुळे अतिरिक्त डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहक आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून शॉपिंग करू शकतात. कोणत्या साईटवर कोणत्या बँकेच्या कार्डला डिस्काउंट मिळत आहे, आणि कोणत्या कार्डवर किती डिस्काउंट मिळत आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

Amazon-Flipkart Sale
Amazon-Flipkart Sale : अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे सेल एकाच दिवशी होणार सुरू; जाणून घ्या कोणत्या अन् किती असणार ऑफर्स?

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये अ‍ॅक्सिस, कोटक आणि ICICI बँकेंच्या कार्डवर डिस्काउंट मिळणार आहे. तर अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये एसबीआयच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे.

कार्ड इन्सायडरने दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. हा डिस्काउंट 5000 रुपयांपेक्षा जास्तीच्या खरेदीवर असेल. तसंच, यामध्ये जास्तीत जास्त 1,250 रुपयांची सूट मिळेल. मात्र अ‍ॅक्सिस बँकेच्या कॉर्परेट किंवा कमर्शिअल कार्डवर ही ऑफर लागू नसणार आहे.

याच सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्डच्या वापरावर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. यासाठी 5,000 रुपयांपेक्षा अधिक खरेदी करावी लागेल, तसंच यामध्ये जास्तीत जास्त 1,750 रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर ICICI बँक कॉर्परेट किंवा कमर्शिअल कार्डवर लागू नाही.

Amazon-Flipkart Sale
Underwear Sales : भारतातील लोक अंडरवेअरच घेईनात! जॉकी, रुपा अन् डॉलरला बसतोय मोठा फटका; मंदीचे संकेत

कोटक महिंद्राच्या क्रेडिट कार्डवर देखील 10 टक्के डिस्काउंट ऑफर मिळत आहे. 5,000 रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर जास्तीत जास्त 1,250 रुपये सूट मिळेल. तर EMI ऑप्शन्स सिलेक्ट केल्यास हीच सूट 1,500 रुपयांपर्यंत असेल. याव्यरितिक्त स्मार्टफोन्सच्या ठराविक ब्रँड्सवर देखील त्या-त्या कंपनीने ठरवल्यानुसार डिस्काउंट मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.