Amazon Great Indian Festival: ॲमेझॉनचा फेस्टिव्ह सेल; आयफोन,सॅमसंग अन् शाओमी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काउंट,ऑफर्स बघाच

amazon great indian festival 2024 smartphone deals : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 27 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये ॲमेझॉन ग्राहकांना फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट देणार आहे.
amazon great indian festival 2024 smartphone deals
amazon great indian festival 2024 smartphone dealsesakal
Updated on

Great indian festival 2024 smartphone discount offers : देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हलपैकी एक असलेलसस ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 27 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये ॲमेझॉन ग्राहकांना फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट देणार आहे.

iPhone 13, Samsung Galaxy S23 Ultra आणि Xiaomi 14 सारख्या टॉप स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. विशेष म्हणजे, Amazon Prime सदस्यांना 26 सप्टेंबरपासून या सेलमध्ये अर्ली ऍक्सेस मिळणार आहे.

ग्राहकांना या डिव्हाइसेस Wishlist मध्ये आगाऊ समाविष्ट करून ठेवता येतील आणि सेल सुरू झाल्यावर त्वरित खरेदी करता येईल. चला तर, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट मिळणार आहे...

amazon great indian festival 2024 smartphone deals
iPhone Netflix Discontinue : आयफोन अन् iPad डिव्हाइसवर Netflix होणार बंद; कंपनीने युजर्सना दिला मोठा झटका

iPhone 13 Smartphone: सुरुवातीची किंमत 79,900 रुपये असलेला iPhone 13 सध्या 49,900 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. पण ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये बँक ऑफर्ससह हा फक्त 37,999 रुपये इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे. हा स्मार्टफोन 6.1-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले, दमदार Apple A15 बायोनिक प्रोसेसर आणि 12-मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरासह येतो.

Samsung Galaxy S23 Ultra Smartphone: Amazon आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Samsung Galaxy S23 Ultra वर मोठा डिस्काउंट देत आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1,49,999 रुपये होती. पण बँक आणि कूपन ऑफर्ससह हा फक्त 69,999 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. या हाय-एंड फोनमध्ये दमदार Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 6.8-इंचचा आकर्षक QHD+ डिस्प्ले आणि 200MP मुख्य सेन्सरसह अत्याधुनिक कॅमेरा सिस्टीम आहे. यात अनेक टेलीफोटो आणि अल्ट्रावाइड लेन्स देखील समाविष्ट आहेत.

amazon great indian festival 2024 smartphone deals
Chandrayaan 3 Moon Crater : चांद्रयान-3 ची कमाल! प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर शोधला 160 किमीचा रुंद खड्डा, जगभरातून होतंय कौतुक

Xiaomi 14 Smartphone: Xiaomi 14 ला ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये मोठा डिस्काउंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन 69,999 ॲमेझॉनमध्ये लाँच झाला होता. पण Amazonच्या या सेलमध्ये सर्व डिस्काउंट मिळाल्यानंतर हा फक्त 47,999 रुपये इतक्या कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. या प्रिमियम फोनमध्ये 6.55-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि दमदार Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे. यात 50MP मुख्य सेन्सर, 50MP टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स असलेली ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे.

Related Stories

No stories found.