Amazon Great Republic Day Sale : अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या तारखा आज (बुधवारी) जाहीर करण्यात आल्या आहेत. हा चार दिवसांचा सेल 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 20 जानेवारीपर्यंत चालेल. अॅमेझॉनने दावा केला आहे की, कंपनीकडून स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सर्व मोठ्या डिव्हाइसवर बंपर डील्स ऑफर केल्या जातील या Amazon सेलमध्ये इंस्टट बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शन्स देखील उपलब्ध असतील.
इतर ऑफरमध्ये, सेलमध्ये मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्के सूट तसेच टीव्हीवर 60 टक्के सूट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी, Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल रविवार, 16 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजल्यापासून सुरू होईल म्हणजेच त्यांना 24 तास लवकर याचा एक्सेस मिळेल.
या वस्तूंवर मिळेल बंपर डिस्काउंट
- ऍमेझॉन सेलमध्ये Apple, iQoo, OnePlus, Samsung, Tecno आणि Xiaomi सारख्या ब्रँडच्या फोनवर 40 टक्के डिस्काउंट Redmi, OnePlus, Sony, Samsung आणि Xiaomi सारख्या ब्रँडच्या TV वर 60 पर्यंत डिस्काउंट दिला जाईल.
- Intel, HP, Boat, Lenovo, Asus, Dell, Samsung, LG आणि Sony या कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट.
अॅमेझॉनने हे देखील सांगीतले आहे की, सेलमध्ये किचन आणि घरगुती उपकरणांवर 50 ते 70 टक्के सूट मिळेल. तसेच, Amazon Combos वर 40% पर्यंत सूट मिळेल.
सेलमध्ये लॅपटॉपवर 40,000 सूट, हेडफोन्स 250 रुपयांपासून सुरू. कॅमेऱ्यांवर 50 टक्के डिस्काउंट आणि स्मार्टवॉचवर 60 टक्के डिस्काउंट मिळणार आहे.
- व्हिडिओ गेम्सवर 55 टक्के डिस्काउंट , फायर टीव्ही उपकरणांवर 48 टक्के डिस्काउंट आणि इको स्मार्ट स्पीकरवर 50 टक्के डिस्काउंट दिला जाईल. किंडल ई-रीडरवर 3,400 रुपयांची सूट देण्यात येत आहे.
SBI क्रेडिट कार्ड इंस्टट डिस्काउंट
Amazon ने ग्रेट रिपब्लिक डे सेल अंतर्गत डील, डिस्काउंट आणि ऑफरबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी त्यांच्या साइटवर एक डेडिकेटेड वेबपेज तयार केले आहे. Amazon सेल दरम्यान SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या किंवा EMI व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. त्याचप्रमाणे, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड, Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड, Amazon Pay Later आणि निवडक डेबिट तसेच क्रेडिट कार्ड्सवर नो-कॉस्ट EMI असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.