AI Use in Journalism : एआयचा वापर करून बातम्या लिहिणे भोवले! पत्रकाराला द्यावा लागला राजीनामा

Artificial Intelligence Use in News Media: एका वृत्तसंस्थेतील पत्रकाराने बातम्या लिहिण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Cody Enterprise, Journalist, AI, US News
Cody Enterprise Journalist Caught Using AISakal
Updated on

US Wyoming reporter Use AI to Create Fake Quotes

वायोमिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence चा वापर केल्याने अमेरिकेत एका पत्रकाराला राजीनामा द्यावा लागला आहे. एआयचा वापर करून नेते, अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया तयार केल्याचं तपासातून समोर आले आहे. हा सर्व प्रकार एका पत्रकारानेच उघड केल्यानंतर वृत्तपत्र समूहाला संपादकीयमधून जाहीर माफी मागावी लागली आहे.

कोडी एंटरप्राइज (CodyEnterprise) या वृत्तपत्रात एरॉन (Aaron Pelczar) हा पत्रकार नोकरी करत होता. २ ऑगस्टला एरॉनने राजीनामा दिला. यासाठी कारणीभूत ठरले दुसऱ्या दैनिकातील पत्रकार सी जे बेकर. बेकर हे गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. बेकर दररोज सकाळी स्पर्धक दैनिक वाचतात. 'आपल्या क्षेत्रातील अन्य पत्रकार कोणत्या बातम्या देत आहेत, आपल्या परिसरातील घडामोडी कोणत्या' हा त्या मागचा उद्देश. मात्र, जूनमध्ये बेकर यांना CodyEnterprise या वृत्तपत्रात छापून येणाऱ्या बातम्यांवर शंका आली. या सर्व बातम्या एरॉनने दिल्या होत्या. जुलै महिन्यात एरॉनच्या एका बातमीनंतर बेकर यांचा निर्धार पक्का झाला.

Cody Enterprise, Journalist, AI, US News
UPI Latest Update : बँक खाते नसताही करता येणार ऑनलाईन पेमेंट; UPI मध्ये मोठे अपडेट,काय आहे डिलेगेटेड पेमेंट सिस्टम?

Exculsive नव्हे खोट्या प्रतिक्रिया

बेकर यांनी एरॉनच्या बातम्यांमधील संदर्भ तपासले. एरॉनच्या बातम्यांमध्ये गव्हर्नर, सरकारी अधिकारी यांच्या प्रतिक्रिया छापून यायच्या. या प्रतिक्रिया दुसऱ्या दैनिक, वृत्तवाहिन्यांवर नव्हत्या. बेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. "आम्ही एरॉनला ओळखत नाही, त्याने कधी आमच्या प्रतिक्रिया घेतल्याच नव्हत्या", असे त्या अधिकाऱ्यांनी बेकर यांना सांगितले.

Cody Enterprise, Journalist, AI, US News
ChatGPT Images : केवळ सबस्क्रिप्शन असणाऱ्यांसाठीची ही सुविधा झाली फ्री! ChatGPT मध्ये मिळतील एकदम भारी AI फोटो, कसे बनवायचे?

बातम्यांमधील भाषा ही निबंधांसारखी

बेकर यांचा पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने बातम्यांमधील इंग्रजी शब्द, वाक्यरचना याचा अंदाज होता. त्यांनी एरॉनच्या बातम्यांमधील शब्द आणि वाक्यरचना याचाही अभ्यास केला. एरॉनच्या बातम्या या निबंधासारख्या वाटायच्या. बातम्यांचा शेवट अक्षरश: गुंडाळल्यासारखा वाटायचा. शेवटी बेकर यांनी पुराव्यानिशी त्यांच्या दैनिकात बातमी प्रसिद्ध केली आणि एरॉनचे 'AI कारनामे' उघड झाले. एरॉनने AI चा वापर केल्याची कबुली दिल्याचा दावा बेकर यांनी केला आहे.

संपादकीयमधून मागावी लागली माफी

एका पत्रकारानेच एरॉनची पोलखोल केल्यानंतर वृत्तपत्र समूहाने एरॉनची चौकशी केली. यात एरॉनने एआयचा वापर केल्याचे उघड झाले आहे. सोमवारी CodyEnterprise या वृत्तपत्राने संपादकीयमधून माफी मागितली आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाही, असंही समूहाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.