OnePlus Nord 2 चा पुन्हा स्फोट; वापरकर्त्याला गंभीर दुखापत

another oneplus nord 2 5G explodes severe burns to user
another oneplus nord 2 5G explodes severe burns to user Sakal
Updated on

वन प्लस कंपनी ही आपल्या फोनच्या फिचर्स आणि इतर गोष्टींमुळे चर्चेत असते, दरम्यान OnePlus Nord 2 फोन लॉंच झाल्यापासून या फोनच्या वापरकर्त्यांना अनेक अडचणीन सामोरे जावे लागत आहे. भारतात OnePlus Nord 2 या वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आला आणि तेव्हापासून OnePlus Nord 2 ला सतत आग लागल्याच्या, स्फोट झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

सुहित शर्मा नावाच्या एका ट्विटर युजरने नुकतेच एक ट्विट केले की, ज्यामध्ये त्याने त्याच्या OnePlus Nord 2 चा स्फोट झाला आणि त्यामुळे त्याची पायची मांडी भाजली. या व्यक्तीने या घटनेचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याला झालेली जखम, जळालेला जीन्सचा खिसा दिसत आहे. युजरच्या खिसा जळाल्याचे या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा वापरकर्ता OnePlus Nord 2 मध्ये आग लागल्याची तक्रार करतो, तेव्हा कंपनी आगीच्या कारणासाठी वापरकर्त्याला जबाबदार धरते. दरम्यान आता आणखी एका OnePlus Nord 2 ला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणावर, कंपनीने आपण अशा घटनांना गांभीर्याने घेतो आणि आम्ही त्या वापरकर्त्यांशी संपर्क साधत आहोत आणि प्रकरणाची चौकशी करत आहोत असे सांगीतले आहे, मात्र वनप्लस नॉर्ड 2 ला आग लागण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही देखील एकदा नाही तर अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत

another oneplus nord 2 5G explodes severe burns to user
गुगलचा नवा नियम आजपासून लागू; सर्वच वापरकर्त्यांसाठी असेल अनिवार्य

दरम्यान OnePlus Nord 2 मध्ये आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु याआधी आणखी एका OnePlus Nord 2 ला आग लागल्यानंतर कंपनीने युजरचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. OnePlus Nord 2 भारतात 27,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.

सप्टेंबरच्या महिन्यात दिल्लीस्थित एका वकिलाने दावा केला होता की, फोनचा बॉम्बसारखा स्फोट झाला होता, आणि त्यांच्या कपड्यांना आग लागली. या दाव्यावर वनप्लसने वकिलाविरुद्धच नोटीस जारी केली होती.

another oneplus nord 2 5G explodes severe burns to user
पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.