Apollo 11 Mission : एका साध्या पेनानं वाचवले होते नील आर्मस्ट्राँगचे प्राण

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे यान मिशन वरून परत येताना बिघडले होते.
Apollo 11 Mission
Apollo 11 Missionesakal
Updated on

A Pen Saved Neil Armstrong's Life In Marathi :

नासाने १९६९ मध्ये अपोलो ११ मिशनद्वारे मानवाला चंद्रावर पाठवले होते. या मिशनमुळे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य ठरला. दि. २० जुलै १९६९ ला अपोलो लूनर मॉड्यूल यान चंद्रावर उतरले. आणि दि. २४ जुलै १९६९ मध्ये यान सुखरूप पृथ्वीवर परतले.

चला जाणून घेऊया अपोलो ११ मिशन कशा प्रकारे साकारण्यात आले. यात आलेल्या अडचणी आणि एडविन आल्ड्रिन व नील आर्मस्ट्राँग कसे परतले?

अपोलो ११ चे १०२ तास आणि ४५ मिनीटांचे उड्डाण

अमेरिकेच्या आकाशात १६ जुलै १९६९ मध्ये अपोलो ११ ने सकाळी ९ वाजून ३२ मिनीटांनी उड्डाण भरले. १०२ तास ४५ मिनीटांचे हे उड्डाण होते. त्यानंतर अपोलो ११ लूनर मॉड्यूल ईगल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.

तर इकडे पृथ्वीवर साधारण ४ लाख लोकांची टीम त्या पहिल्या माणसाला चंद्रावर पाऊल ठेवताना बघण्यासाठी उत्सुक होते. यासाठी सगळ्यांनीच महिनोन् महिने मेहनत केली होती.

Apollo 11 Mission
Chandrayan-3 : चांद्रयान चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी घेणाऱ्या रितू करिधल कोण आहेत?

नील आर्मस्ट्राँगची स्थिती

त्याचवेळी तिकडे चंद्रावर उतरेपर्यंत नील आर्मस्ट्राँग फार शांत होते. पण जसे ते आपल्या यानातून बाहेर निघाले, त्यांच्या हृदयाची गती प्रचंड वाढली. इकडची टीम घाबरलेली होती. पण यापासून अनभिज्ञ असणाऱ्या नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. आणि त्याबरोबरच इतिहास रचला गेला.

आजवर सुमारे १२ लोकांनी चंद्रावर आपल्या पाऊल खुणा नोंदवल्या आहेत. पण त्याच दरम्यान एक रोमांचक घटना घडली. ज्यात एका बॉल पेनानं या अंतराळवीरांचे प्राण वाचवले. काय घडले जाणून घेऊया.

Apollo 11 Mission
Chandrayan 3: चांद्रयान 3 मोहिमेसाठी ISRO सज्ज; पुढील महिन्यात 'या' तारखेला होणार लॉन्च?

चंद्रावरून आणली माती

जेव्हा एडविन आल्ड्रिन आणि नील आर्मस्ट्राँग बाहेर निघाले तेव्हा त्यांनी चंद्रावर भरपूर फोटो काढले. यात ते ऐतिहासिक फोटोज पण आहे, ज्यात चंद्रावर त्यांच्या बुटांचे निशाण दिसतात. त्यांनी सोबत अमेरिकाचा झेंडापण नेला होता, जो दोघांनी मिळून चंद्रावर लावला.

यात झेंडा पूर्ण उघडू शकला नाही ज्यामुळे असं वाटतं की झेंडा चंद्रावर फडकत आहे. त्यानंतर त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरच्या मातीचे नमूने घेतले. त्यांनी २१.५५ किलो माती पृथ्वीवर आणली. नील आणि एल्ड्रिन चंद्रावर २१ तास ३१ मिनीटं राहिले.

काय आहे घटना?

चंद्रावरून परतताना त्यांच्यासोबत एक भयानक घटना घडली. त्यांच्याकडून लूनर मॉड्यूलमधला एक स्विच तुटला. जो त्यांना चंद्रावरून पृथ्वीवर परत येण्यासाठी फार महत्वाचा होता. जर हा स्विच चालला नसता तर हे दोन्ही अंतराळवीर कायमचे अंतराळातच राहिले असते.

अशाच एल्ड्रिनने मोठ्या हुशारीने एका बॉल पेनला त्या स्विचच्या जागी लावले. दोघांनी त्यानेच स्विचचे काम केले आणि यानाने पुन्हा चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने उड्डाण घेतले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.