हॅकर्स (Hackers)रोज कित्येक लोकांची फसवणूक करतात. वेगवेगळ्या पध्दती वापरून ते कोणत्या ना कोणत्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरी करतात किंवा एखाद्या व्यक्तीची वैयक्तित माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट किंवा फोनमधून चोरतात. त्यासाठी ते नेहमी नवीन नवीन पद्धती वापरतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की हे लोक फक्त सर्व सामान्य लोकांना किंवा छोट्या कंपन्याना चूना लावतात तर तो तुमचा गैरसमज आहे.
अॅपल (Apple), मेटा (Meta) आणि डिस्कॉर्ड (Discord) सारख्या दिग्गज टेक कंपन्यांना देखील हे हॅकर्सना मूर्ख बनवतात. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. अमेरिकेत असे घडले. हॅकर्सच्या जाळ्यामध्ये ऍपल आणि फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा अडकली.आणि स्वत:च हॅकर्सला आपल्या यूजर्सचा खाजगी डेटा दिला आहे. जो पर्यंत या कंपनीला आपली चूक कळली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अॅपल, मेटा आणि डिस्कॉर्ड या जगातील दोन मोठ्या कंपन्या गेल्या वर्षी हॅकर्सनी यूजर्सचा डेटा मिळवण्यासाठी हॅक केल्या होत्या. हॅकर्सनी स्वतःला कायदेशीर अधिकारी असल्याचे सांगून कंपन्यांना इमर्जन्सी डेटा रिक्वेस्ट (Emergency Data Requests) पाठवली. अॅपल, मेटा आणि डिसकॉर्डने विनंती स्वीकारली आणि हॅकर्सचा यूजर्सचा डेटा दिला. हॅकर्सनी यूजर्सना त्रास देण्यास सुरुवात केल्यावर कंपन्यांना त्यांची चूक लक्षात आली.
यूएस मध्ये, कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना यूजर्स डेटा मागण्यासाठी कंपन्यांना सर्च वॉरंट द्यावे लागते किंवा अशा आदेशावर न्यायाधीशाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. तथापि, तेथील नियम असा आहे की, जर यूजर्सच्या डेटाची गरज असेल तर ते कंपन्यांना इमर्जन्सी डेटा रिक्वेस्ट (Emergency Data Requests) पाठवू शकतात आणि कंपन्या सर्च वॉरंट किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय देखील यूजर्सचा डेटा देण्यास करण्यास बांधील आहेत.
हॅकर्स त्यांची ओळख लपवतात आणि सोशल मीडिया आणि गेमिंग कंपन्यांना इमर्जन्सी डेटा रिक्वेस्ट पाठवतात. हॅकर्सना हे माहित होते की कंपन्यांकडे अशा खोट्या इमर्जन्सी डेटा रिक्वेस्ट तपासण्याचा कोणताही मार्ग नाही आणि त्यांनी अशा विनंत्यांवर त्वरित कारवाई केली आणि डेटा प्रदान केला. विनंती खरी वाटवी यासाठी हॅकर्सनी पोलिस ईमेल सिस्टमचा वापर केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अॅपल आणि मेटाने आता अशा हॅकर्सच्या जाळ्यात येऊ नये म्हणून आवश्यक पावले उचलली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.