Back To School Sale 2024 : अ‍ॅपलचा धमाकेदार सेल झालाय सुरु; मोठ्या बचत ऑफर्ससह iPad, MacBook वर मिळणार हे फ्री गिफ्ट,जाणून घ्या

Apple Sale 2024 : अ‍ॅपलचा बॅक टू स्कुल सेल आहे लाईव्ह;वर्षातील सर्वात मोठी बचत ऑफर,कोणत्याही गॅजेट्सवर मिळणार फ्री गिट्स
apple back to school sale 2024 india
apple back to school sale 2024 indiaesakal
Updated on

Apple Sale : विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अ‍ॅपलने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे.अ‍ॅपलचा वार्षिक बॅक टू स्कूल सेल सुरु झाला आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला iPad, MacBook वर मोठ्या बचतीसह अनेक आकर्षक डील्स मिळतील.

२० जून पासून सुरु झालेली ही सेल ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात तुम्ही आधुनिक टेक्नॉलॉजी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी सोडू नका.यामध्ये आजू काय काय ऑफर्स आहेत आणि काही फ्री गिफ्ट्स देखील मिळणार आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

करा बचत आणि मिळवा फ्री AirPods

या वर्षी अ‍ॅपलची बॅक टू स्कूल सेल खास आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना लेटेस्ट M2 आणि M4 चिप असलेल्या iPad Air आणि iPad Pro वर मोठी सूट मिळणार आहे. लॅपटॉप अपग्रेड शोधणाऱ्यांसाठी M2 आणि नवीन M3 चिप असलेल्या MacBook Air ची ऑफर आहे. तसेच प्रोफेशनल MacBook Pro आणि स्टाईलिश iMac (2023) व कॉम्पॅक्ट Mac mini (2023) चीही ही ऑफर लागू आहे.

apple back to school sale 2024 india
Flipkart Minutes : 15 मिनिटात वस्तू तुमच्या हातात; झेप्टो, ब्लिंकिटशी स्पर्धा करण्यासाठी फ्लिपकार्टची 'Minutes' सेवा होतीये लाँच

एवढेच नाही तर अ‍ॅपल काही निवडक खरेदींवर फ्री AirPods (3rd Generation) देत आहे. तुम्ही जर MacBook Air, MacBook Pro, iMac किंवा Mac mini खरेदी केल्यावर तुम्हाला AirPods पूर्णपणे फ्री मिळतील. त्याचबरोबर, iPad Air खरेदी करणाऱ्यांना फ्री Apple Pencil आणि iPad Pro खरेदी करणाऱ्यांना फ्री Apple Pencil Pro मिळणार आहे. हे नोट्स घेण्यासाठी, चित्र रेखाटण्यासाठी आणि क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी उत्तम आहेत.

ऑफरची माहिती

  • iPad Air (2024): ११ इंच मॉडेलची किंमत रु. ५४,९९० पासून सुरु होते. तर १३ इंच मॉडेलची किंमत रु. ७४,९९० आहे. दोन्ही मॉडेल्स WiFi आणि WiFi + Cellular पर्यायांत उपलब्ध आहेत. प्रत्येक खरेदीसोबत तुम्हाला फ्री Apple Pencil (किंमत रु. ६,९००) मिळेल.

  • iPad Pro (2024): ११ इंच iPad Pro ची किंमत रु. ८९,९०० आणि १३ इंच मॉडेलची किंमत रु. १,१९,९०० आहे. दोन्ही मॉडेल्स WiFi आणि WiFi + Cellular पर्यायांत उपलब्ध आहेत. यासोबत तुम्हाला फ्री Apple Pencil Pro (किंमत रु. १०,९००) मिळेल.

  • MacBook Air: M2 चिप असलेल्या MacBook Air ची किंमत रु. ८९,९९० पासून सुरु होते. तर नवीन M3 चिप असलेल्या मॉडेल्सची किंमत रु. १,०४,९०० आहे. प्रत्येक MacBook Air खरेदीसोबत तुम्हाला फ्री AirPods (3rd Generation) (किंमत रु. १९,९००) मिळतील.

apple back to school sale 2024 india
Elon Musk on Apple : ॲपलसोबत OpenAI च्या युतीमुळे इलॉन मस्क संतापले, मोठा निर्णय घेणार? नेमकं काय आहे प्रकरण?
  • MacBook Pro (2023): १४ इंच मॉडेलची किंमत रु. १,५८,९०० आणि १६ इंच मॉडेलची किंमत रु. २,२९,९०० आहे. MacBook Air सारखेच, प्रत्येक MacBook Pro खरेदीसोबत तुम्हाला फ्री AirPods (3rd Generation) मिळतील.

  • iMac (2023) आणि Mac mini (2023): iMac (2023) ची किंमत रु. १,२९,९०० आणि Mac mini (2023) ची किंमत रु. ४९,९०० आहे. दोन्ही डिव्‍हाइसेससोबत तुम्हाला फ्री AirPods (3rd Generation) मिळतील.

अ‍ॅपलच्या या सेलची धूम सगळीकडे सुरु आहे.आत्तापर्यंत मोठ्या संख्येने लोकांनी या सेलच्या ऑफर्सचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील लवकरच जवळच्या अ‍ॅपल स्टोअरला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.