Apple Terminates Electric Car Project : जगप्रसिद्ध आयफोन निर्माती कंपनी ‘ॲपल’ने आपला इलेक्ट्रिक मोटार निर्मिती प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांपासून कंपनी या प्रकल्पावर काम करत होती. परंतु, अद्याप कोणताही प्रोटोटाइप तयार करण्यात यश न आल्याने अखेर कंपनीने आपला हा प्रकल्प गुंडाळला आहे. ॲपलने प्रथमच असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केला आहे.
या निर्णयामुळे कंपनीचा पहिला इलेक्ट्रिक मोटार प्रकल्प ‘टायटन’वर काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ विल्यम्स आणि या प्रकल्पाचे प्रभारी उपाध्यक्ष केविन लिंच यांनी या प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली. या प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात हलवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Apple unplugs self-driving electric car project)
पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि व्हॉइस कमांडवर चालणारी मोटार आणण्यासाठी कंपनीने २०१५ मध्ये हा प्रकल्प सुरू केला होता. त्यासाठी कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली होती. ॲपलने या प्रकल्पासाठी फोर्ड आणि अन्य मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांमधून या क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांना नियुक्त केले होते.
कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी ॲपल इलेक्ट्रिक मोटार (Apple Electric Car) निर्मितीत उतरणार असल्याचे सूतोवाच जाहीररित्या केले होते. त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याचा कंपनीचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात येणारी ही मोटार या क्षेत्रातील मोठे संशोधन ठरले असते. मात्र हे स्वप्न आता स्वप्नच राहिले आहे.
दरम्यान, ॲपलच्या या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक्सचे सीईओ इलॉन मस्कनेही इमोजींच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कारला 'विंडोज' लावाव्या लागतील हे लक्षात आल्यामुळे ॲपलने हा प्रोजेक्ट गुंडाळला" अशी मिश्किल प्रतिक्रियाही एकाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.